कायदा


गोपनीयता धोरण

1.आम्ही गोळा करतो त्या माहितीचे प्रकार

आम्ही तुमच्या कडून खाली प्रकारची माहिती गोळा करू आणि वापर करूः

· तुम्ही आम्हाला द्यावयाची माहितीः मंचावर नोंदणी केल्यानंतर आणि /किंवा वापर केल्यानंतर तुम्ही आम्हाला तुमच्या विषयी माहिती द्यावयाची आहे, त्याततुमचे नाव, वय, लिंग, पत्ता, इमेल पत्ता, सोशल मिडिया लॉगीन तपशील, टेलीफोन क्रमांक आणि आर्थिक व क्रेडिट कार्डची माहिती आणि तुमचा फोटो, तसेच तुमची भाषा निवड. त्याचप्रमाणे, या श्रेणीत तुमचे कस्टमर प्रोफाइल, तुम्ही आमच्या मंचावर करत असलेल्या टिप्पण्या(इतर वापरकर्त्याने तयार केलेल्या विषयामध्ये तुम्ही दिलेल्या आभासी गोष्टीचाही समावेश), खाते आणि बिलाचे तपशील, यात पैसे भरण्याच्या किंवा पैसे काढण्याच्या हेतूसाठी आवश्यक असणाऱ्या तुमच्या अॅपल, गूगल किंवा विंडोज खाते, पेपाल किंवा इतर तिसऱ्या पक्षाचे पेमेंट चॅनेल खाते यांचा समावेश आहे किंवा इतकेच ते मर्यादित नाही. यात तुम्ही आमच्या मंचावर प्रसारण करण्यासाठी निवडलेल्या वापरकर्त्याने तयार केलेले विषय, फोटो आणि व्हिडिओ यांचा सुध्दा समावेश आहे. ट्विटर, फेसबुक, इन्साटग्राम किंवा गूगल यासारख्या विशिष्ट सोशल मिडिया साइट वरील वरील तुमची वापरकर्ता अधिकारपत्रे वापरून सुध्दा नोंदणी करू शकता. तुमच्या देशाच्या कायद्यांवर आधारीत संवेदनशील किंवा गंभार समजली जाणारी विशिष्ट वैयक्तिक माहिती तुम्ही आम्हाला देणे निवडू शकता. अशा प्रकारची माहिती अशा प्रकारच्या कायद्याच्या नुसार विशेष संरक्षणाचा विषय असू शकते.

· तुमच्या सोशल नेटवर्क मधून तुम्ही शेअर करण्यासाठी निवडलेली माहिती. जर तुम्ही मंचाला तुमचे सोशन नेटवर्क किंवा सार्वजनिक फोरम खाते(उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा गूगल) जोडण्याचे निवडले असेल तर तुमच्या सोशल नेटवर्क किंवा सार्वजनिक फोरम खात्यावरील माहिती तुमच्या कॉन्टॅक्ट यादी सह आम्हाला द्याल किंवा तुमच्या सोशल नेटवर्क वरून ती घेण्याची परवानगी द्याल. या माहिती मध्ये अशा प्रकारच्या सार्वजनिक फोरमच्या आणि /किंवा सोशल नेटवर्कच्या तुमच्या वापरा संबंधीच्या माहितीचा समावेश असेल. तुमच्या माहितीवर सोशल नेटवर्क पुरवठादार कशा प्रकारे आणि कोणत्या होतूसाठी प्रक्रिया करतात या माहितीसाठी, कृपया या सोशल नेटवर्क पुरवठादारांच्या संबंधित खाजगी पॉलिसी कडे नजर टाका.

· तुमच्या विषयी आम्ही गोळा केलेली तांत्रिक माहिती. तुम्ही मंचाचा वापर कधी करता, तुमचा आयपी पत्ता, लोकेशन संबंधी माहिती(खाली वर्णन केल्या प्रमाणे) किंवा इतर विशिष्ट डीव्हाइस अभिज्ञापक,तुमचा ब्राऊजिंग इतिहास (मंचावर तुम्ही पाहिलेल्या विषयांसह), कुकीज (खाली वर्णन केल्याप्रमाणे), तुमचा मोबाइल कॅरियर, टाइम झोन सेटिंग, मोबाइल किंवा डिव्हाइस माहिती, यात तुमच्या डिव्हाइसचे मॉल, तुमच्या स्क्रीनचे निराकरण, ऑपरेटिंग यंत्रणा आणि मंच तसेच हा मंच वापरण्याशी संबंधित माहितीचा समावेश आहे.

· आम्ही गोळा केलेली तुमच्या वापराविषयी माहितीः तुम्ही सेवांच्या केलेल्या वापरासंबंधी माहिती सुध्दा आम्ही गोळा करतो, उदा. आमच्या मंचावरील तुमच्या टिप्पण्या किंवा इतर वापरकर्त्याने टाकलेले विषय आणि व्हिडिओ जे तुम्ही आमच्या मंचाद्वारे पुढे पाठवता आणि प्रसारित करता. तसेच, आम्ही तुमचे कॉन्टॅक्ट किंवा तुमच्या अॅक्टिव्हिटीत असणारे ग्राहक माहिती आमच्या मंचाशी जोडतो, ती तुमच्या सर्व डिव्हाइसशी तुमचा इमेल किंवा सोशल मिडिया लाग-इन तपशील वापरून जोडली जाते. एंगेजमेंट स्कोअर(जसे की लाइक्स, कमेंट, पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे)आणि तुमच्या वर्तनावर आधारीत संबंधित वापरकर्ते आम्ही गोळा करतो. जेव्हा तुम्ही आमचा मंच वापरता, जरी तुम्ही कोणतीही कमेंट केली नाहीत किंवा एकही विषय अपलोड केला नाही आणि फक्त ब्राऊजिंग केले तरी आम्ही पाहण्याची माहिती किंवा सामान्य वर्तनशील पध्दती गोळा करतो. अखेरीस, आम्ही निवड आणि संचार प्राधान्ये गोळा करतो.

· लोकेशन माहिती. जेव्हा तुम्ही या मंचाचा वापर तुमच्या मोबाइल द्वारे करता तेव्हा आम्ही तुमच्या लोकेशनची माहिती गोळा करू शकतो. तुमच्या संमती सह, आम्ही ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम(जीपीएस) माहिती आणि मोबाइल डिव्हाइस लोकेशन माहिती गोळा करू शकतो.

· तृतीय पक्षीय माहिती. आम्ही ऑपरेट करत असलेल्या इतर कोणत्याही वेबसाइट जर तुम्ही वापर केला किंवा आम्ही देत असलेल्या इतर सेवांचा तुम्ही वापर केला तर आम्हाला तुमच्या विषयी माहिती मिळेल. आम्हाला तृतीय पक्षांकडून सुध्दा माहिती मिळेल (जसे की जाहिरात नेटवर्क आणि विश्लेषणात्मक पुरवठादार) तसेच इतर स्त्रोत, यात व्यावसायिक निर्देशिका आणि इतर आर्थिक किंवा सार्वजनिकरीत्या उपलब्ध स्त्रोत यांचा समावेश आहे.

· तुमचा फोन आणि फेसबुक कॉन्टॅक्ट. तुम्ही मंच वापरणाऱ्या इतर वापरकर्त्यांना शोधू शकता एकतर (१) तुमच्या फोनवरील कॉन्टॅक्ट मधून किंवा (२) फेसबुक कॉन्टॅक्ट मधून. जर तुम्ही तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट मधून इतरांना शोधत असाल तर आम्ही ते पाहू शकतो आणि तुमचे फोन कॉन्टॅक्ट गोळा करू, त्यात नावे, फोन क्रमांक, पत्ते आणि तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्सची फोन वर राखून ठेवलेली इतर माहिती यांचा समावेश आहे, मंचाच्या आधीच्या वापरकर्त्यांशी ते जुळत आहेत का याची तपासणी करू. जर तुम्ही फेसबुक कॉन्टॅक्टचा वापर केला इतर वापरकर्त्यांना शोधण्यासाठी, तर आम्ही तुमच्या फेसबुक कॉन्टॅक्ट मधील तुमची सार्वजनिक फेसबुक माहिती तसेच नावे आणि प्रोफाइलची माहिती गोळा करू.

· मेसेजेज. तुम्ही दिलेल्या माहितीचे आमच्या सेवेच्या मेसेजिंग फंक्शनॅलिटी द्वारे आम्ही संकलन करू आणि त्यावर प्रक्रिया करू ( स्कॅनिंग आणि विश्लेषणाच्या समावेशासह), यात वैयक्तिक माहिती, कॉम्पोझिंग, सेंडिंग किंवा रिसिव्हिंग मेसेजेज(याचा अर्थ आहे की जेव्हा मेसेज सेंट, रिसिव्हड आणि /किंवा रीड केला जातो आणि सहभागी व्यक्तींचे संभाषण या विषयीचे घटक व माहिती) या प्रकारांचा समावेश आहे. कृपया आमच्या सेवेच्या इतर वापरकर्त्यांना मेसेज पाठविताना काळजी घ्या कारण ते इतर वापरकर्त्यांना पाहता येतील आणि त्याचा इतर वापरकर्ते वापर करतील किंवा ते उघड करतील याला आम्ही जबाबदार नाही.

· मेटाडाटा. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करता मंचावर (युजर कंटेंट),तुम्ही ऑटोमॅटिकली तो विशिष्ट मेटाडाटा अपलोड करता जो युजर कंटेंटशी जोडलेला आहे. थोडक्यात, मेटाडाटा इतर डाटाचे वर्णन करतो आणि तुमच्या युजर कंटेंटची माहिती पुरवतो, जी प्रेक्षकांसाठी नेहमीच उघड असणार नाही. तुमच्या व्हिडिओशी जोडल्यानंतर मेटाडाटा तो कसा, केव्हा आणि कोणत्या युजर कंटेंट कडून गोळा केला आहे आणि तो कंटेंट कसा स्वरूपित केला गेला आहे याची माहिती वर्णन करू शकते. तुमच्या खात्याचे नाव अशी माहिती हवी असल्यास इतर वापरकर्त्यांना व्हिडिओचा शोध घेत तुमच्या युजर खात्याकडे यावे लागते. मेटाडाटा पुढे जास्तीच्या माहितीचा समावेश करेल, जर तुम्ही ती व्हिडिओ सोबत दिली असेल उदा. कोणताही हॅशटॅग वापरून व्हिडिओ किंवा कमेंट चिन्हांकित करण्यासाठी निवडले असेल तर.

· ट्रॅन्झॅक्शन डाटा. इन-अॅप परचेसेज मधून तुम्ही कॉइन पॅक विकत घेणे निवडू शकता. आभासी भेटवस्तू विकत घेण्यासाठी तुम्ही हे कॉइन वापरू शकता आणि ते इतर वापरकर्त्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून त्यांना ते लाइव्ह ब्रॉडकास्ट दरम्यान किंवा त्यांच्या चॅनेल वर पाठवू शकता. जेव्हा तुम्ही कॉइन विकत घेण्याचा पर्याय निवडता तेव्हा तुम्ही तुमचे अॅप स्टोअर तुमच्या मोबाइल डिव्हाइस वर खरेदी पूर्ण करण्यासाठी ट्रान्सफर कराल. या खरेदी सोबत जोडलेली तुमची वैयक्तिक माहिती आम्ही गोळा करू. शिवाय, जर तुम्ही गिफ्ट पॉइंट पॉलिसीनुसार तुमच्या अॅपल आयट्यून्स किंवा गूगल प्ले खात्याचा वापर करून काही गिफ्ट पॉइंटस विकत घेतले असतील, तर आम्ही पेमेंटच्या पुष्टीची प्रक्रिया सुरू करू आणि तुमच्या खात्यावर क्रेडिट करू.

2.कुकीज

· आम्ही कुकीज आणि तशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो (उदा. वेब बेकन्स, फ्लॅश कुकीज, इ.) (कुकीज) मंचाचा वापर करण्याचा अनुभव जास्त चांगला देण्यासाठी, आमच्या सेवा सुधारण्यासाठी, आणि तुम्हाला लक्षित जाहिरातींसह प्रदान करण्यासाठी. कुकीज या छोट्या फाइल्स असतात, त्या जेव्हा तुमच्या डिव्हाइस वर ठेवल्या जातात तेव्हा त्या आम्हाला काही वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी सक्षम करतात. तुम्ही जेव्हा आमच्या मंचाला, इतर मंचाला किंवा बायटेंडन्स द्वारे देण्यात आलेल्या उत्पादनाला आणि वेबसाइटला आणि बायटेडन्स उत्पादने वापरणाऱ्या इतर कंपनीच्या अॅपला भेट देता तेव्हा आम्ही कुकीज तुमच्या डिव्हाइस वर ठेवतो.

आम्ही खालील कुकीज वापरतोः

· अति आवश्यक कुकीज. मंचाच्या चालण्यासाठी या प्रकारच्या कुकीज आवश्यक आहेत. त्यात उदाहरणार्थ कुकीज ज्या तुम्हाला मंचाच्या सुर७त क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सक्षम करतात, त्यांचा समावेश आहे.

· कार्यक्षमता कुकीज. या कुकीज तुम्हाला तुम्ही या मंचावर परत आल्यावर ओळखण्यासाठी वापरल्या जातात. यामुळे आम्हाला आमचे कंटेंट तुमच्यासाठी वैयक्तिक करण्यात सक्षम करतात, तुम्हाला नावाने अभिवादन करण्यात आणि तुमचे प्राधान्य लक्षात ठेवण्यात मदत करतात. (उदाहरणार्थ, तुमच्या निवडीची भाषा किंवा प्रांत). या कुकीज मंचावरील लॉग-इन फंक्शनला ९० दिवसांपर्यंत पाठिंबा देतात.

· सोशल मिडिया कुकीज. या कुकीज वापरकर्त्यांना मंचावर खाते तयार करण्यासाठी परवानगी देतात त्यांच्या आधीच्या इतर सेवांसाठी लॉग-इनचा वापर करून (उदाहरणार्थ, फेसबुक साठी आणि गूगल).

· परफॉर्मन्स कुकीज. या कुकीजचा वापर तुम्ही या मंचाला किती वेळा भेट दिली, तुम्ही भेट दिलेल्या पानांची संख्या आणि तुम्ही फॉलो केलेल्या लिंक्स, यांची माहिती गोळा करण्यासाठी केला जातो, तसेचइतर वेबसाइट किंवा अॅप्लिकेशनला तुम्ही संवाद साधला असल्यास त्याची माहिती सुध्दा गोळा केली जाते. मंचाचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आम्ही या माहितीचा वापर करू.

· मार्केटिंग कुकीज. या कुकीज मंचावर जाहिराती टाकण्यासाटी वापरल्या जातात तसेच तुमच्या आवडीशी संबंधित जाहिराती बनविण्यासाठी वापरल्या जातात. यामुळे जाहिराती मोहिमांची कार्यक्षमता तपासण्यात सुध्दा मदत होते. या कारणासाठी आम्ही ही माहिती तृतीय पक्षाकडे पाठवू शकतो. आमच्या मंचावरील तुमच्या संभाषणा विषयी माहिती आमचे सेवा पुरवठादार सुध्दा वापरू शकतात, त्यातून ते तुम्हाला इतर वेबसाइट आणि अॅप्लिकेशन वरील इतर लक्षित जाहिरातींसह सेवा देऊ शकतात.

· विश्लेषणात्मक कुकीज. विश्लेषणात्मक कुकीज प्रेक्षकांची गणना करण्याची यंत्रणा आहे आणि त्याचा वापर आम्ही आमच्या सेवांसाठी करतो, त्यातून आम्हाला तुम्ही कोणत्या वेब पेज वरर क्लिक केले आहे आणि हा मंच तुम्ही कसा वापरता या विषयी मोजदाद करण्यात मदत मिळते. ( अधिक माहितीसाठी खाली पहा)

जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला कुकीजचा लाभ घ्यायचा नसेल, तर तुम्ही तुमच्या ब्राऊजरवर सेटिंग बदलून डिसेबल करू शकता. तथापि, जर तुम्ही तस केले तर, त्याचा तुमच्या मंचावरील करमणूकीवर परिणाम होऊ शकेल आणि आम्ही तुम्हाला वैयक्तिक कंटेंट पाठवू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही कुकीज मधून बाहेर पडत नाही तोपर्यंत कुकीज वापरण्याला तुमची संमती आहे असे समजून चालू.

डू नॉट ट्रॅक सिग्नल्स प्राधान्य आहेत, त्यात वापरकर्ता त्यांच्या वेब ब्राऊजर सेट करू शकतात, की त्यांची अॅक्टिव्हिटी किती काळ तृतीय पक्षी वेबसाइटवर किंवा ऑनलाइन सेवांवर ट्रॅक केली जाईल. तुमच्या वेब ब्राऊजर वरील डू नॉट ट्रॅक सिग्नल्सना मंच प्रतिसाद देत नाही.

विश्लेषणात्मक माहिती

आमच्या मंचावर आम्ही तृतीय पक्षी विश्लेषणात्मक टूल वापरतो, त्यातून आम्हाला वाहतूक आणि सेवेच्या वापराचे कल मोजण्यात मदत होते. वाहतूक म्हणजे सेवेवरील वापरकर्त्यांच्या सभोवताली चाललेल्या अॅक्टिव्हिटीज साठी विविध डाटा फ्लो असा आहे. हे टूल्स, उदाहरणार्थ, तुमच्या डिव्हाइस वरून पाठविण्यात आलेली किंवा आमच्या सेवां विषयी माहिती, यात तुम्ही भेट दिलेली पेजेज, अॅड-ऑन, आणि इतर माहितीचा समावेश आहे, जी आम्हाला आमच्या सेवेत सुधारणा करण्यात मदत करेल. ही माहिती मंचाचा एक वापरकर्ता म्हणून तुमचा रिपोर्ट आणि तुमच्या अॅक्टिव्हिटीज व पध्दतींचे मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे या अॅक्टिव्हिटीज नुसार सेवा देता येते.

आमचे तृतीय पक्षी विश्लेषणात्मक टूल आहे गूगल अॅनालिटिक्स, जे गूगल, इंक (१६०० अँम्फिथिएटर पार्खवे माऊंटन व्ह्यू, सीए ९४०४३, यूएसए) यांनी दिलेले आहे. गूगल अॅनालिटिक्स कुकीज वापरतात, छोट्या कुकीज, छोट्या मजकूराच्या फाइल मध्ये अक्षरीव आकड्यांच्या रूपात एक मालिका अशते आणि ती तुमच्या संगणकावर राखून ठेवलेली असते. आमच्या सेवांचा वापर किंवा वर वर्णन केलेल्या इतर संबंधित सेवा देण्यासाठी गणिती मोजणी करण्यासाठी गूगल तुमच्या आयपी अॅड्रेसमधून काढलेल्या माहितीचा वापर करेल. गूगल अॅनालिटिक्स तुमची माहिती तुमच्या कडून कशी गोळा करते आणि त्यावर कशी प्रक्रिया करते यासाठी आणि गूगलच्या माहती संकलनातून कसे बाहेर पडता येईल याविषयीच्या माहिती साठी कृपया येथे क्लिक करा. तुम्हाला अधिक माहिती येथे मिळू शकेल Google Analytics Terms of Service & Privacy.

त्यानंतर आम्ही फेसबुक पिक्सेल वापरतो आणि ते फेसबुक इंक., १ हॅकर वे, मेन्लो पार्क, सीए ९४०२५, युएसए(फेसबुक) यांचे आहे. हे टूल तुम्ही फेसबुक वर आमच्या जाहिराती पाहिल्या तर त्या उघड करण्याच्या जाहिरातीच्या हेतूने वापरले जाते. जर तुम्हाला फेसबुकने तुमच्या विषयीची वर्णन करण्यात आलेली माहिती गोळा करू नये असे वाटत असेल तर तुम्ही फेसबुकच्या कुकीज आणि फेसबुक पिक्सेल्सच्या वापरातून बाहेर पडू शकता येथे.

3.तुमची माहिती आम्ही कशी वापरतो

आम्ही तुमच्या विषयी गोळा केलेली माहिती खाली मार्गांनी वापरूः

o मंच प्रशासित करण्यासाठी (उदा.आमच्या सेवा तुम्हाला देण्यासाठी) आणि अंतर्गत ऑपरेशन साठी, यात ट्रबलशूटिंग, डाटा विश्लेषण, टेस्टिंग, रिसर्च, स्टॅटिस्टिकल आणि सर्व्हेचे हेतू(उदा. मंचाची स्थिरता आणि सुरक्षेची गॅरंटी देणे), आणि तुमचे फीडबॅक मागणे यांचा समावेश आहे.

o मंचाच्या परस्पर संवादी फीचर्स मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला परवानगी देणे, जेव्हा तुम्ही तसे करण्याचे निवडाल तेव्हा,

o तुम्हाला प्राप्त झालेले कंटेंट वैयक्तिक करणे आणि तुम्हाला आखिव कंटेंट

o पुरविणे, यात लोकेशन- संबंधी माहितीचा समावेश आहे, ज्यात तुम्हाला स्वारस्य असेल.

o आमच्या मंचात सुधारणा घडविणे आणि विकसीत करणे आणि उत्पादन विकास आयोजित करणे.,

o तुम्हाला आणि इतरांना आम्ही सेवा देत असलेल्या जाहिराती मोजणे आणि त्यांचा प्रभावीपणा जाणून घेणे.,

o तुम्ही निवडलेल्या देशाच्या सेटींग वर आधारीत सेवा तुम्हाला देणे, जसे की जाहिराती आणि इतर कंटेंट जे देशाच्या सेटींग शी संबंधित आहे.

o तुम्हाला आणि मंचाच्या इतर वापरकर्त्यांना वस्तू किंवा सेवां विषयी ज्यात तुम्हाला किंवा त्यांना स्वारस्य असेल, सूचना आणि शिफारशी करणे.,

o सेवाचे वापरकर्ते असल्यामुळे फाइंड अदर फ्रेंडस फंक्शन द्वारे इतर वापरकर्त्यांना तुम्हाला ओळखण्याची परवानगी देणे, तसेच तुम्हाला इतर वापरकर्त्यांना ओळखण्याची परवानगी देणे आणि मंचावर त्यांच्या शी जोडले जाण्याची परवानगी देणे, तसेच सेवेच्या सोशलायझिंग फंक्शनला सपोर्ट करणे.,

o तुमच्या प्रोफाइल माहितीसह तुम्ही निवडलेल्या कोणालाही तुमची माहिती पुरविणे आणि मंचावर सहभागी होण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला सक्षम करणे.,

o तुम्ही निवडलेल्या गोपनीय सेटींगनुसार तुमची संबंधित माहिती इतर वापरकर्त्यांना उपलब्ध करून देणे.,

o तुम्ही लाइक केलेल्या किंवा संवाद साधलेल्या कंटेंटशी मिळतेजुळते कंटेंट (कमेंट करून आणि /किंवा कंटेंट पाहून) तुम्हाला दाखविणे, तुमच्या प्रांतातील कंटेंट तसेच तुम्ही फॉलो केलेल्या वापरकर्त्यांचे कंटेंट.,

o तुमच्याशी संबंधित असणाऱ्या जाहिराती तुम्हाला दाखवणे.,

o तुम्ही आम्हाला दिलेली माहितीचा वापर करणे आणि सेवांना प्रोत्साहन देणे, जसे की तुम्ही आमच्या मंचावर प्रसारण करण्यासाठी निवडलेले युजर कंटेंट आणि व्हिडिओ कंटेंट, हे आमच्या जाहिरात आणि मार्केटिंग मोहिमेचे एक भाग असतील मंचाला प्रमोट करण्यासाठी.,

o आमची मेसेंजर सेवा फंक्शन मध्ये आणण्यासाठी( जर हे फंक्शन तुम्ही निवडले तर या माहितीवर फक्त प्रक्रिया केली जाते) आणि यासाठी तुमच्या विवेकानुसार क्लीअर कॅचे फंक्शन द्वारे मंचाच्या सेटींगच्या आत डीलीट हे फंक्शन तुम्ही निवडू शकता.,

o जाहिराती, ऑफर्स आणि तुमच्यासाठी इतर स्पॉन्सर्ड कंटेंट निवडणे आणि वैयक्तिक करणे.,

o मंचावरील गैरवर्तन, फसवणूक आणि बेकायदेशीर कामे शोधण्यात आम्हाला मदत करणे.,

o आमच्या सेवांचा वापर करण्याचे तुमचे वय आहे याची खात्री करण्याचा प्रयत्न करणे (कायद्याच्या आवश्यकतेनुसार).,

o आमच्या सेवांमधील बदलां विषयी तुम्हाला सूचना देणे.,

o तुमच्याशी संवाद साधणे.

o तुम्हाला वापरकर्त्यांचा सपोर्ट पुरविणे.,

o आमच्या अटी, शर्ती आणि पॉलीसींची अंमलजबावणी करणे.,

तुमच्या कडून रक्कम प्राप्त करणे आणि /किंवा तुम्हाला रक्कम देणे डायमंड आणि फ्लेम तरतुदींनुसार ज्या पुरवणी अटींनुसार- सेवेच्या अटींच्या अंतर्गत येणाऱ्या आभासी वस्तू पॉलीसी किंवा एका वेगळ्या प्रिमियम कंटेंट क्रिएटर अॅग्रीमेंट अंतर्गत, जे लागू असेल त्यानुसार.

4. तुमची माहिती आम्ही कशी सामायिक करतो

मंचावरील या मंचावरील जास्तीत जास्त अॅक्टिव्हिटी सार्वजनिक आहेत, त्यात तुमची प्रोफाइल माहिती, तुमचा टाइम झोन आणि भाषेचा समावेश आहे, जेव्हा तुम्ही तुमचे खाते तयार करता आणि तुमचे व्हिडिओ आणि तुमच्या अॅक्टिव्हिटी विषयी विशिष्ट माहिती, जसे की तारीख, वेळ, आणि अॅप्लिकेशन आणि तुम्ही वापरत असलेल् मंचाचे व्हर्जन यांचाही यात समावेश आहे. तुमच्या अॅक्टिव्हिटी मध्ये किंवा तुमच्या प्रोफाइल मध्ये तुमचे लोकेशन प्रकाशित करण्याचे सुध्दा तुम्ही निवडू शकता.

आम्ही तुमची माहिती खालील निवडक तृतीय पक्षांना सांगूः

· आमच्या व्यवसाय भागीदारांना, त्यामुळे आम्ही मंचा द्वारे तुम्हाला विशेष ऑफर देऊ शकू.,

· जाहिरातदार आणि जाहिरातीचे नेटवर्क त्यांना तुम्हाला आणि इतरांना सेवा देण्यासाठी

· आणि निवडण्यासाठी डाटाची आवश्यकता असते.

· क्लाउड स्टोरेज पुरवठादार,यांना तुम्ही दिलेली माहिती स्टोअर करण्याची आणि आप्तकालीन

· रिकव्हरी सेवांसाठी, तसेच आम्ही तुमच्या सोबत केलेल्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टच्या परफॉर्मन्स

· साठी त्याची गरज असते.

· विश्लेषण आणि सर्च इंजिन पुरवठादार जे आम्हाला मंचाच्या सानुकूलते मध्ये आणि विकासात

· मदत करतात., आणि आयटी सेवा पुरवठादार.,आमचे डाटा सेंटर आणि आमच्या होस्ट पुरवठादारांचे सर्व्हर.,

· सामान्य जनतेला, जर तुम्ही सार्वजनिक माहिती अधिसूचित केली असेल तर अशा प्रसंगी ती विशिष्ट माहिती, यात तुमचे युजरनेम, लोकांसह तुम्ही सांगू इच्छित असलेली कोणताही माहिती, इतर वापरकर्त्यांनी सांगीतलेली तुमच्याशी संबंधित माहिती, तुमच्या सार्वजनिक प्रोफाइल वरील माहिती इ. चा समावेश असेल.

वरील हेतूंच्या कारणासाठी, आम्ही तुमची माहिती आमच्या कार्पोरेट ग्रुपच्या कोणत्याही सदस्याला, सहाय्यक, पॅरेंट किंवा संलग्न ग्रुपला सांगू, मंचाच्या विकासात आणि सानुकूलते मध्ये साहाय्य व्हावे, बेकायदेशीर वापराला अटकाव करता यावा यासाठी, वापरकर्त्यांची संख्या वाढण्यासाठी, विकास, इंजिनियरिंग आणि माहितीचे विश्लेषण किंवा आमच्या अंतर्गत व्यावसायिक हेतूंसाठी (आम्ही तुमच्या माहितीचा कसा वापर करतो)

आम्ही तुमची माहिती कायदा अंमलबजावणी एजन्सी, सार्वजनिक प्राधिकऱण किंवा इतर संस्था यांना कायद्याने करणे आवश्यक असल्यास किंवा अशा प्रकारचा वापर करण्याची खरेच आवश्यकता असेल तर सांगूः

· कायदेशीर बांधीलकी, प्रक्रिया किंवा विनंतीचे पालन करतानाः

· आमच्या सेवांच्या अटी, आणि इतर करारनामे, पॉलीसी आणि मानके लागू करण्यासाठी, यात संभाव्य उल्लंघनाच्या शोधाचा समावेश आहे.

· शोधणे, टाळणे किंवा अन्यथा पत्त्याची सुरक्षा, फसवणूक किंवा तांत्रिक समस्या., किंवा

· आमची, आमच्या वापरकर्त्यांची, तृतीय पक्षाची किंवा जनतेच्या हक्काचे, मालमत्तेचे किंवा सुरक्षेचे संरक्षण कायद्याच्या आवश्यकतेनुसार किंवा परवानगी नुसार करणे ( यात फसवणूकी पासून संरक्षण आणि क्रेडिट जोखीम कमी करण्यासाठी माहितीची इतर कंपन्यांशी आणि संस्थांशी अदलाबदल करणे यांचा समावेश आहे)

आम्ही तुमची माहिती तृतीय पक्षांना सुध्दा उघड करूः

· आम्ही जर एखादा व्यवसाय किंवा मालमत्ता विकत असू किंवा खरेदी करत असू तर त्यावेळी आम्ही तुमचा डाटा अशा मालमत्तेच्या किंवा व्यवसायाच्या संभाव्य विक्रेता किंवा खरेदीदार यांना उघड करू. किंवा

· जर आम्ही विकलेल्या, खरेदी केलेल्या, विलीन केलेल्या मालमत्तेसोबत किंवा व्यवसाय संपादित केलेल्या, किंवा भागीदारासोबत, इतर कंपनी किंवा व्यवसायांसोबत, किंवा आमच्या मालमत्ते पैकी काही किंवा सर्व विक्री केले, किंवा आम्ही निरवानिरव किंवा दिवाळे वाजल्याच्या प्रक्रियेत गुंतलो असू. अशा प्रकारच्या व्यवहारात, वापरकर्त्यांची माहिती मालमत्तेसोबत हस्तांतर केली जाईल.

5. तुमचे हक्क

अॅक्सेस आणि अपडेशन

जेव्हा तुम्ही एक खाते नोंदणी करता, तेव्हा तुम्ही विशिष्ट वैयक्तिक माहिती अक्सेस आणि अपडेट केली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला आम्ही ऑनलाइन खात्यात लॉगइन पुरवू शकू आणि तेथे उपलब्ध असलेल्या फीचर्स आणि फंक्शनालिटीचा वापर करता येईल, तुम्ही जर तुमची ओळख व्हेरिफाय करू शकला नाहीत किंवा तुमच्या खात्याशी संबंधित काही संशयास्पद अॅक्टिव्हिटी आढळून आल्यास त्यावर काही उदाहरणात बंदी घातली जाईल.

व्यवस्थापन प्राधान्ये

तुम्ही तृतीय पक्षी जाहिराती प्राधान्यांचे व्यवस्थापन करू शकता, काही तृतीय पक्षींसाठी आम्ही काम करत आहोत अशा इंटरनेटवरील सर्व प्रकारच्या जाहिरातींसह सेवा मिळवू शकता येथे क्लिक करून आणि उपलब्ध असलेल्या निवडींचा वापर करून http://www.networkadvertising.org/managing/opt_out.asp and www.aboutads.info/choices.

भाषणातून बाहेर पडणे

अनसबस्क्राइब लिंक किंवा आमच्याकडून तुम्हाला मिळालेल्या मार्केटिंग किंवा जाहिराती मध्ये नोंदविण्यात आलेल्या इमेल्स चा वापर करून तुम्ही मार्केटिंग किंवा जाहिरातीच्या इमेल मधून बाहेर पडू शकता.

तुमचे जीपीएस किंवा मोबाइल डीव्हाइस लोकेशनची माहिती जर तुम्ही आम्हाला सांगू इच्छित नसाल तर तुम्ही लोकेशन माहिती फंक्शनालिटी स्विच ऑफ करू शकता.

6. तुमच्या माहितीची सुरक्षा

तुमची माहिती सुरक्षित राहील आणि पॉलीसीशी संलग्न राहील याची आम्ही काळजी घेतो. दुर्दैवाने, इंटरनेट द्वारे माहितीचे हस्तांतरण पूर्णपणे सुरक्षित नाही. तरीही आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, उदाहरणार्थ, एलक्रायप्टेशन करत असताना आम्ही मंचा द्वारे हस्तांतर होणाऱ्या तुमच्या माहितीच्या सुरक्षेची गॅरंटी देऊ शकत नाही., कोणतेही हस्तांतरण हे तुमच्या जोखमीवर करावे लागेल.

तुम्ही आणि इतर वापरकर्त्यांच्या हक्क आणि स्वातंत्र्याच्या भिन्न शक्यता आणि तीव्रतेच्या जोखमींची योग्य सुरक्षा पातळी आहे की नाही यासाठी आमच्याकडे योग्य तांत्रिक आणि संस्थात्मक साधने आहेत. आम्ही हे तंत्रज्ञान आणि संस्थात्मक साधने व्यवस्थित राखून ठेवतो आणि आमच्या यंत्रणेच्या संपूर्ण सुरक्षेच्या सुधारणे साठी वेळोवेळी त्यात बदल करतो.

आमच्या भागीदारी नेटवर्क, जाहिरातदार आणि संलग्न वेबसाइट मधून वेळोवेळी लिंक्स आम्ही समाविष्ट करत असतो. जर तुम्ही या वेबसाइट वरील लिंक फॉलो करत असाल तर कृपया लक्षात घ्या की या वेबसाइटची त्यांची स्वतःची प्रायव्हसी पॉलीसी असते आणि आम्ही या पॉलीसीची कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्विकारत नाही. अशा प्रकारच्या वेबसाइट वर कोणतीही माहिती तुम्ही टाकत असताना कृपाय त्या पॉलीसी तपासून पहा.

लक्षात घ्या की तुम्ही जर प्रथमच व्हिडिओ मंचावर अपलोड करत असाल, तर तुम्हाला सूचित केले जाईल की तुम्ही पब्लिक खात्यातून मंचाचा वापर करत आहात, याचा अर्थ आहे की तुम्ही टाकलेला व्हिडिओ मंचावरील प्रत्येक वापरकर्ता पाहणार आहे, जरी तो तुम्हाला जोडलेला नसला तरी. तुम्ही माहितीच्या प्रवेशावरील प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा घालू शकता, जर तुम्ही तुमच्या प्रायव्हसी सेटिंग मधील माहितीच्या विंडो मध्ये तसे सुचवले असेल तर. मंचावरील प्रायव्हसी सेटिंग मधील बदल हे लगेच अमलात येतील आणि तुम्ही मागील काळात पोस्ट केलेल्या माहितीवर सुध्दा त्याचा परिणाम होईल. एकदा का तुम्ही संबंधित युजीव्ही किंवा प्रसारीत केलेले कंटेंट किंवा तुम्ही तुमच्या प्रोफाइल मध्ये दिलेली इतर माहिती डीलीट करण्याचे ठरविले की आम्ही तुमची माहिती डिलीट करू.

7. तुमची माहिती आम्ही किती काळ राखून ठेवतो

तुमची माहिती किती काळ राखून ठेवावी हे ठरविण्यासाठी आम्ही खालील निकष वापरतोः

· कराराप्रती असणाऱ्या आमच्या जबाबदाऱ्या आणि हक्क माहितीच्या संदर्भात किती गुंतलेले आहेत.,

· डाटा विशिष्ट कालावधीसाठी राखून ठेवण्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या, लागू असलेल्या कायदा आणि नियमांनुसारलागू असलेल्या कायद्यानुसार कायद्याची बंधने.,

· आमच्या कायदेशीर व्यावसायिक हेतूंसाठी., आणि

· विवाद किंवा संभाव्य विवाद.

तुम्ही आमची सेवा खंडित केल्यानंतर, आम्ही तुमची माहिती एकत्रित आणि अनामित स्वरूपात जतन करू शकतो. पूर्वगामी असूनही, आम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती राखून ठेवू शकतो कारण तसे करणे आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी आवश्यक आहे, विवादांचे निराकरण आणि न्यायासाठी आणि मच्या करारनाम्याच्या अंमलजबावणी साठी आम्हाला तसे करण्याची परवानगी आहे.

8. लहान मुलांशी संबंधित माहिती

१३ वर्षांच्या खालील मुलांसाठी हा मंच निर्देशित केलेला नाही. जर आम्हाला दिसून आले की १३ वर्षांच्या खालील व्यक्तीची माहिती वैयक्तिक माहिती गोळा झालेली आहे तर आम्ही ती माहिती डीलीट करू आणि त्या व्यक्तीचे खाते काढून टाकू. जर तुमचा विश्वास आहे की आम्ही १३ वर्षांच्या खालील मुलाची माहिती गोळा केलेली आहे तर कृपया येथे आमच्याशी संपर्क साधा. privacy@tiktok.com.

9.बदल

या पॉलीसीची सर्वात चालू आवृत्ती तुमच्या डाटावर आम्ही करत असलेल्या प्रक्रियेवर राज्य करेल. तुमच्या सातत्याच्या अॅक्सेस मधून किंवा सेवांच्या वापरातून तुम्ही अपडेटेड पॉलीसी स्विकारल्याच्या तारखेनंतर की पॉलीसी अपडेट होत रहाते. जर तुम्हाला अपडेटेड पॉलीसी मान्य नसेल, तर तुम्ही सेवा घेणे किंवा सेवांचा वापर करणे थांबविले पाहिजे. आम्ही सामान्फणे आमच्या मंचा द्वारे नोटीस देऊन सर्व वापरकर्त्यांना पॉलीसी मध्ये काहीही बदल असल्यास कळवतो. तथापि, तुम्ही ही पॉलीसी काही बदल आहे का हे तपासण्यासाठी नियमितपणे पाहिली पाहिजे. आम्ही या पॉलीसीच्या वरच्या भागात लास्त अपडेटेड तारीख सुध्दा अपडेट करू, ज्यातून या पॉलीसीची परिणामकारक तारीख दिसून येईल.