नमस्कार पालकांनो! या पेजवर टिकटॉक समजून घेण्यासाठीची साधने आणि मदत मिळेल आणि ह्या ॲपचा आणि कम्युनिटीचा सर्वोत्तम अनुभव कसा घ्यावा ह्याविषयी तुमच्या किशोरवयीन मुलामुलींना कमी मदत करावी हे कळेल.
आम्ही नेहमीच तुमच्या किशोरवयीन मुलामुलींच्या एकूणच ऑनलाईन अनुभवामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देत असतो. इंटरनेट सुरक्षितता, ऑनलाईन प्रायव्हसी आणि त्यांना उपलब्ध असलेल्या ऑप्शन्स याविषयी त्यांच्याशी लवकर संवाद साधा. तुमचे मार्गदर्शन अमूल्य ठरू शकते!
टिकटॉक काय आहे?
टिकटॉक हे जगभरातील शॉर्ट-फॉर्म मोबाईल व्हिडिओज्साठी अग्रगण्य ठिकाण असू शकते. जगभरातील सर्जनशीलता, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे क्षण कॅप्चर करून ते सादर करणे हे आमचे मिशन आहे. टिकटॉक प्रत्येकाला त्यांच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून थेट निर्माता बनण्यासाठी सक्षम बनवते आणि युजर्सना त्यांच्या व्हिडिओज्च्या माध्यमातून त्यांची पॅशन आणि सर्जनशील अभिव्यक्ती शेअर करण्यासाठी समुदाय निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
टिकटॉक कोणासाठी तयार करण्यात आले आहे?
१३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या युजर्ससाठी टिकटॉक तयार करण्यात आलेले आहे. कृपया १३ वर्षांखालील मुलामुलींना हे ॲप वापरण्याची परवानगी देऊ नका.
तुम्हाला जर असे आढळले की, तुमच्या १३ वर्षांखालील मुलाने/मुलीने टिकटॉक खात्यासाठी नोंदणी केलेली आहे, तर तुम्ही आम्हाला https://www.tiktok.com/legal/report/privacy येथे लिहून सावध करू शकता. आम्ही तातडीने योग्य ती कारवाई करू.
अधिक योग्य वापरासाठी कृपया आमच्या सेवांच्या अटी आणि कम्युनिटीची मार्गदर्शक तत्त्वे पहा.
मी माझ्या किशोरवयीन मुला/मुलीला टिकटॉक ॲप डाऊनलोड करण्यापासून परावृत्त करू शकतो/ते का?
तुमच्या किशारेवयीन मुला/मुलीच्या इंटरनेटच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो, ज्यात ते डाऊनलोड करू शकत असलेल्या ॲपचाही समावेश आहे. आयओज् आणि अँड्रॉईड्स् दोन्हींमध्ये पालकांना नियंत्रण ठेवता येईल अशी तरतूद केलेली आहे, ज्यामुळे तुम्हला विशिष्ट ॲप्स, फीचर्स, मुव्हीज्, म्युझिक आणि अजून बरेच काही डिव्हाईसच्या पातळीवरच ब्लॉ करता येते किंवा त्यांच्यावर मर्यादा घालता येते.
टिकटॉक हे १३ वर्षांवरील युजर्ससाठी असल्याने आम्ही त्याला सक्तपणे १२+ ॲप रेटिंग दिलेले आहे. यामुळे तुमच्या अल्पवयीन मुलाच्या फोनमध्ये हे ॲप ब्लॉ करून पालक डिव्हाईसवर आधारित नियंत्रण ठेवू शकतात.
पालकांना नियंत्रण ठेवण्यासाठी (किंवा ‘बंधने घालण्यासाठी’) आणि ते कसे सक्रिये करावे हे जाणून घेण्यासाठी अधिक मदत व्हावी म्हणून कृपया ॲपल ॲप किंवा गुगल प्ले स्टोअरमधील सूचना पहा.
माझा/झी किशोरवयीन मुलगा/मुलगी त्यांचे व्हिडिओज् कोण पाहू शकते आणि त्यांना मेसेजेस पाठवू शकते यावर कसे नियंत्रण ठेवू शकेल?
युजर्स त्यांनी अपलोड केलेला मजकूर कोण पाहू शकेल, त्यांना कोण फॉलो करू शकेल आणि मेसेजेस पाठवू शकेल यावर, त्यांचे खाते प्रायव्हेट करून नियंत्रण ठेवू शकतात. प्रायव्हेट खात्यासह युजर्स फॉलोअर्सना मान्यता किंवा नकार देऊ शकतात आणि त्यांनी अपलोड केलेला मजकूर आणि आलेले मेसेजेस फॉलोअर्सपुरतेच मर्यादित ठेवू शकतात.
युजरचे जर पब्लिक प्रोफाईल असेल, तर टिकटॉकमध्ये साईन केलेला कोणीही त्या युजरचे पब्लिक व्हिडिओज् पाहू शकेल. परंतु फक्त मान्यता दिलेले फॉलोअर्सच त्या युजरला मेसेजेस पाठवू शकतात.
युजर्स पब्लिक किंवा प्रायव्हेट अकाऊंट ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात का? ते तसे नेहमीच करू शकतात.
- त्यांना इतरांनी कोणत्याही वेळी संपर्क करण्यासाठी ब्लॉक करा
- व्हिडिओ प्रायव्हेटला सेव्ह करा म्हणजे तो इतर कोणत्याही युजर्सना पाहण्याजोगा राहणार नाही.
- कॉमेंट्स, ड्युएट्स किंवा मेसेजेसवरील रेस्ट्रिक्शन्स एनेबल करा.
तुमच्या किशोरवयीन मुला/मुलीला त्यांच्या टिकटॉक अनुभवारवर नियंत्रण ठेवण्यास मदत होण्यासाठीच्या सेटिंग्जसाठी आमच्या टूल्स पेजला भेट द्या.
कृपया लक्षात ठेवा: प्रायव्हेट अकाऊंट असतानाही प्रोफाईल फोटो, युजरनेम आणि बायो यांच्यासह प्रोफाईल माहिती सर्व युजर्सना पाहता येईल. तुमच्या मुला/मुलीला त्याचे/तिचे वय, पत्ता किंवा फोन नंबर त्याच्या/तिच्या प्रोफाईलमध्ये उघड न करण्याविषयी सल्ला द्या.
माझे किशोरवयीन मूल अयोग्य मजकूर किंवा वर्तन यांविषयीची माहिती कशी देऊ शकेल?
आमच्या सेवेच्या अटींचा भंग होऊ शकेल असे काही जर तुमच्या मुला/मुलीने पाहिले, तर त्याविषयीची माहिती कृपया आमच्या मॉडरेशन टीमला द्या, जी योग्य ती कारवाई करील. युजरर्स एखादा विशिष्ट व्हिडिओ, युजर किंवा कॉमेंट याविषयी ॲपच्या माध्यमातूनच माहिती देऊ शकेल.
शिवाय, तुमचे किशोरवयीन मूल दुसऱ्या युजरने त्याचा/तिचा मजकूर पाहू नये किंवा त्यांना मेसेजेस पाठवू नयेत म्हणून त्याला ब्लॉक करू शकेल.