कायदा

सेवेच्या अटी

शेवटचे अद्ययावत केलेः फेब्रुवारी २०२०


सर्वसामान्य अटी – भारतात राहणाऱ्या युजर्स साठी

1. आपले आमच्यासोबतचे नाते

बाईटडान्स (इंडीया) टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने तरतूद केलेल्या टिकटॉक (“मंच”) मध्ये आपले स्वागत आहे. टिकटॉक हा सेवा देण्याचा आणि प्रमोट करण्याचा आमचा ब्रँड आहे. भारतातील या सेवांचा वापर करताना कृपया “टिकटॉक”, “आम्ही” किंवा “आपण” असे त्यासाठी वाचा.  

आपण या सेवेच्या अटी वाचत आहात (“अटी”), जे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 सोबत त्याचे नियम यांच्या तरतुदींखाली मान्य एक इलेक्ट्रॉनिक कंत्राट आहे, आणि त्याद्वारे या नात्याचे संचालन करतात आणि आपण आणि आमच्या दरम्यान एक करार म्हणून काम करतात आणि अशा अटी आणि नियम आखून देतात ज्याद्वारे आपण हा मंच आणि आमच्या संबंधित वेबसाईट्स, सेवा, ॲप्लिकेशन्स, उत्पादने आणि कंटेंट (एकत्रितपणे, “सेवा”) यांच्यामध्ये प्रवेश आणि वापर करु शकता. आमच्या सेवा खासगी, अ-व्यापारी वापरासाठी दिलेल्या आहेत. या अटींच्या उद्देशांसाठी, “तुम्ही” आणि “तुमचे” याचा अर्थ या सेवांचा वापर करणारे तुम्ही असा होतो.

या अटी आपण आणि आमच्या दरम्यान एक कायदेशीर बंधनकारक करार ठरतात, आणि म्हणून, कृपया त्या काळजीपूर्वक वाचण्यासाठी वेळ द्या.  आमच्या सेवा वापरुन, आपण नमूद करता कीः

(a) आपण एक बंधनकारक कंत्राट तयार करण्यास कायदेशीर सक्षम आहात; 

(b) आपल्यावर लैंगिक गुन्हा सिद्ध झालेला नाही; 

(c) आपले खाते यापूर्वी आमच्या अटी किंवा धोरणे किंवा मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल निष्क्रीय केले आहे; आणि

(d) आपण या अटी आणि सर्व लागू स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पालन कराल.

2. अटींची स्विकृती

आमच्या सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करुन, आपण पुष्टि करता की आपण टिकटॉक सोबत एक बंधनकारक कंत्राट तयार करु शकता, की आपण या अटी स्विकारता आणि त्यांचे पालन करण्यास मान्यता देता. आमच्या सेवांमधील आपला प्रवेश आणि वापर आमचे गोपनीयता धोरण आणि समुदाय मार्गदर्शक सूचनांच्या अधीन आहे, ज्याच्या अटी थेट या मंचावर, किंवा हा मंच डाउनलोड करण्यासाठी जिथे उपलब्ध केलेला आहे, आपल्या मोबाईलवरील लागू ॲप स्टोअरवर सापडू शकतात, आणि याठिकाणी संदर्भासहित समाविष्ट केल्या आहेत. या सेवा वापरुन, आपण खासगीपणा धोरणाच्या अटींना संमती देता.

वेगळ्या पुरवणी अटी असणाऱ्या अधिकारक्षेत्रात तुम्ही या सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करत असाल, तर तुम्ही खाली अधोरेखित करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारक्षेत्रातील युजर्सना लागू असणार्‍या पुरवणी अटी- अधिकारक्षेत्र-विशिष्ट मान्य करता. तसेच  सप्लिमेंटल टर्म्स-ज्युरिसडिक्शन -स्पेसिफिक मधील ज्या तरतुदी या सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करण्यासाठी तुमच्या अधिकारक्षेत्राशी संबंधित आहेत आणि राहिलेल्या या अटी, त्या संबंधित अधिकारक्षेत्रातील सप्लिमेंटल टर्म्स-ज्युरिसडिक्शन -स्पेसिफिक यांच्यातील  तरतुदी यामध्ये काही मतभेद आढळल्यास, ते त्याजागी येतील किंवा त्यावर नियंत्रण येईल. जर तुम्हाला या अटी मान्य नसतील, तुम्ही आमच्या सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करू शकणार नाही. 

आपण एखादा व्यवसाय किंवा युनिटच्या वतीने या सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करत असाल, तर (a) “तुम्ही” आणि “तुमचे” यामध्ये तुम्ही आणि तो व्यवसाय किंवा युनिट समाविष्ट आहेत, (b) तुम्ही सादर करता आणि हमी देता की आपण तो व्यवसाय किंवा युनिटचे एक अधिकृत प्रतिनिधी आहात आणि या अटी एककाला बंधनकारक करण्याचा अधिकार आपल्याला आहे, आणि त्या युनिटच्या वतीने आपण या अटी मान्य करता, आणि (c) आपला व्यवसाय किंवा एकक या सेवांमध्ये प्रवेश किंवा त्यांचा वापरासाठी तसेच आपले कोणतेही कर्मचारी, एजंट्स किंवा कंत्राटदारांसह, आपल्या एककाशी संलग्न इतरांना आपल्या खात्यामध्ये प्रवेश किंवा वापर करण्यासाठी आपला व्यवसाय किंवा एकक कायदेशीर आणि वित्तीयरित्या जबाबदार आहेत.

आपण आमच्या सेवांमध्ये प्रवेश किंवा त्या वापरुन या अटी स्विकारु शकता. आपण समजता आणि मान्य करता की या सेवांमध्ये प्रवेश किंवा त्यांचा वापर हा तिथून पुढे आपण या अटी स्विकारल्या आहेत असे आम्ही मानू.

आपल्या नोंदींसाठी या अटींची एक स्थानिक प्रत आपण छापावी किंवा साठवून ठेवावी.

3. अटींमधील बदल

आम्ही या अटींमध्ये वेळोवेळी सुधारणा करतो, उदाहरणार्थ आम्ही आमच्या सेवांची कार्यक्षमता अपडेट करतो, जेव्हा आम्ही आमच्याद्वारे किंवा आमच्या सहयोगींद्वारे संचालित अनेक अप्स किंवा सेवा एकाच संयुक्त सेवा किंवा अपमध्ये एकत्रित करतो, किंवा नियामक बदल होतात तेव्हा सुधारणा करतो. आम्ही या अटींमधील कोणत्याही मोठ्या बदलांची सर्वसाधारण सूचना सर्व युजर्सना देण्यासाठी व्यवसायिक दृष्टिने व्यवहारिक प्रयत्न करतो, परंतु, अशा बदलांसाठी आपण या अटी नियमितपणे तपासून पाहाव्या. आम्ही या अटींच्या वरती असलेला “मागील सुधारणा” दिनांक बदलत राहू, ज्यातून अशा अटींचा प्रभावी दिनांक कळेल. नवीन अटींच्या तारखेनंतर आपण या सेवांमध्ये प्रवेश किंवा त्यांचा वापर चालू ठेवणे याचा अर्थ आपण नवीन अटींना मान्यता देता असा होतो. आपण नवीन अटींना मान्यता दिली नाही तर, आपण या सेवांमध्ये प्रवेश करणे किंवा त्या वापरणे थांबविले पाहिजे.

4. आपले आमच्याकडील खाते

आमच्या काही सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करण्यासाठी, आपण आमच्याकडे एक खाते तयार केले पाहिजे. आपण हे खाते तयार करता तेव्हा, आपण अचूक आणि अद्ययावत माहिती दिली पाहिजे. आपण आम्हाला देता तो तपशील आणि अन्य कोणतीही माहिती आपण राखली आणि तत्काळ अद्ययावत केली पाहिजे, जेणेकरुन अशी माहिती वर्तमान आणि संपूर्ण अवस्थेत राहील.

आपण आपल्या खात्याचा पासवर्ड गोपनीय ठेवणे आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाला तो न सांगणे महत्वाचे आहे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिला आपला पासवर्ड माहिती आहे किंवा त्यांनी आपल्या खात्यात प्रवेश केल्याचे आपल्याला कळाले किंवा संशय आला तर आपण तत्काळ आम्हाला https://www.tiktok.com/legal/report/feedback वर कळवावे.

आपण मान्य करता की आपल्या खात्यांतर्गत होणाऱ्या कार्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार (आम्हाला आणि इतरांना) आहात. एक खाते तयार करताना, आपण स्वतःबद्दल अचूक माहिती दिली पाहिजे आणि सक्तीने वैयक्तिक उद्देशांसाठी केवळ एक खाते तयार केले पाहिजे. 

आपले युजर खाते निष्क्रीय करणे, आणि आपण अपलोड किंवा शेअर केलेला कोणताही कंटेंट, कोणत्याही वेळी, काढून टाकणे किंवा निष्क्रीय करणे, याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे, यामध्ये आपण या अटींच्या कोणत्याही तरतुदींचे पालन करण्यास अपयशी ठरला असाल, किंवा आपल्या खात्यावर कार्ये घडल्यास जी, आमच्या सर्वस्वी अधिकारात, या सेवांचे नुकसान किंवा नादुरूस्ती करतील किंवा कोणत्याही तिसऱ्या पक्षांच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप किंवा उल्लंघन करतील, किंवा कोणतेही लागू कायदे किंवा नियमांचे उल्लंघन यांचा समावेश राहील.

आपल्या खासगीपणाचे संरक्षण आम्ही अतिशय गंभीरपणे करतो, आणि म्हणून आपल्या खात्याशी निगडीत सर्व माहितीला डाटा संरक्षणाचे आणि सुरक्षा उपायांचे उच्च मानदंड माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि त्याखालील नियमांच्या अंतर्गत अनिवार्यतेनुसार आम्ही लागू करतो. आमचे वर्तमान खासगीपणा धोरण इथे उपलब्ध आहे. 

आमच्या सेवा यापुढे पुन्हा आपण वापरु इच्छित नसाल, आणि आपले खाते काढून टाकण्याची इच्छा असेल तर, आपल्यासाठी हे काम आम्ही करु. कृपया आम्हाला https://www.tiktok.com/legal/report/feedback यावर संपर्क साधा, आणि आम्ही आपल्याला पुढील सहाय्य करु आणि या प्रक्रियेतून मार्गदर्शन करु. आपले खाते काढून टाकण्याची निवड आपण केली की, आपले खाते पुन्हा सक्रिय करणे किंवा आपण समाविष्ट केलेले कोणतेही कंटेंट किंवा माहिती परत मिळवणे शक्य होणार नाही.

5. आमच्या सेवांमध्ये आपला प्रवेश आणि वापर

या सेवांमधील आपला प्रवेश आणि त्यांचा वापर या अटींच्या आणि सर्व लागू कायदे आणि नियमांच्या अधीन राहील. आपण हे करु शकणार नाही:

  • या अटी मान्य करण्यास आपण पूर्णतः सक्षम आणि कायदेशीर पात्र नसाल तर या सेवांमध्ये प्रवेश किंवा त्यांचा वापर;
  • कोणत्याही पद्धतीने बेकायदेशीर, दिशाभूल करणारे, भेदभावात्मक किंवा घोटाळेबाज कोणतेही कार्य आमच्या सेवांमधील प्रवेश किंवा वापराच्या दरम्यान करणे.
  • सेवांचे किंवा त्यात समाविष्ट कोणत्याही कंटेंटमधून अनधिकृत प्रती करणे, सुधारणा, स्विकार, अनुवाद, रिवर्स इंजिनियर, डिसअसेंबल, डिकम्पाईल किंवा कोणतेही उप कार्य तयार करणे ज्यामध्ये कोणत्याही फाईल्स, कोष्टके किंवा दस्तऐवज (किंवा त्यांचा कोणताही भाग) समाविष्ट राहील किंवा या सेवांमधील किंवा त्यातून निर्मित कार्यामधील कोणताही सोर्स कोड, अल्गोरिदम्स, पद्धती किंवा तंत्रे शोधणे किंवा शोधण्याचा प्रयत्न करणे;
  • कोणत्याही सेवा किंवा त्यातून निर्मित कार्यांचे वितरण, परवाना, हस्तांतरण, किंवा विक्री संपूर्ण किंवा अंशतः करणे;
  • शुल्क किंवा आकारावर सेवांचे विपणन, भाड्याने किंवा कराराने देणे, किंवा जाहिरात किंवा कोणतेही व्यवसायिक समर्थनासाठी सेवांचा वापर करणे;
  • कोणत्याही व्यापारी किंवा अनधिकृत उद्देशाने, आमच्या स्पष्ट लेखी संमतीविना सेवा वापरणे, यामध्ये कोणतेही व्यापारी जाहिरात किंवा हेतु किंवा स्पॅमिंग समाविष्ट राहील;
  • सेवांच्या योग्य कामकाजात हस्तक्षेप करणे किंवा हस्तक्षेपाचा प्रयत्न करणे, आमची वेबसाईट किंवा सेवांशी निगडीत कोणतेही नेटवर्क्स खंडित करणे, किंवा या सेवांच्या वापराला प्रतिबंध किंवा निर्बंध करण्यासाठी आम्ही वापरु त्या कोणत्याही उपायांना बगल देणे;
  • या सेवा किंवा त्यांचा कोणताही भाग अन्य एखादा कार्यक्रम किंवा उत्पादनामध्ये समाविष्ट करणे. अशावेळी, आम्ही सेवेला नकार देणे, खाती समाप्त करणे किंवा सेवांमधील प्रवेश सर्वस्वी आमच्या मर्जीने मर्यादित ठेवण्याचा अधिकार राखून ठेवत आहोत;
  • सेवांमधून माहिती संकलित करण्यासाठी स्वयंचलित संहिता वापरणे किंवा त्यांच्यासोबत अन्यथा संवाद साधणे;
  • कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेची तोतयेगिरी करणे, किंवा कोणतीही व्यक्ति किंवा संस्थेसोबत आपण किंवा आपला संबंध चुकीचा सांगणे किंवा अन्यथा प्रतिनिधीत्व करणे, यामध्ये आपण अपलोड, पोस्ट, संप्रेषित, वितरित करता ते कोणतेही कंटेंट समाविष्ट आहे किंवा सेवांमधून उत्पन्न कंटेंट अन्यथा उपलब्ध करणे;
  • इतरांमध्ये हस्तक्षेप करणे किंवा छळ करणे, किंवा वंश, लिंग, धर्म, राष्ट्रीयत्व, विकलांगता, लैंगिक आमुखीकरण किंवा वयावर आधारित लैंगिक उघड साहित्याचा प्रचार, हिंसाचार किंवा भेदभाव करणे;
  • टिकटॉक कडून अधिकाराविना दुसऱ्याचे खाते, सेवा किंवा सिस्टीम वापरणे किंवा वापरण्याचा प्रयत्न करणे, किंवा सेवांवर चुकीची ओळख तयार करणे;
  • सेवांचा अशा पद्धतीने वापर करणे ज्यामुळे हितसंघर्ष निर्माण होईल किंवा सेवांच्या उद्देशांचा अवमान करणे, जसे की अन्य युजर्ससोबत आढाव्यांची देव-घेव करणे किंवा खोटे आढावे लिहिणे किंवा मागणे;
  • या सेवांचा वापर अपलोड, संप्रेषित, वितरित, साठवण किंवा अन्यथा कोणत्याही पद्धतीने उपलब्ध करणे: फाईल्स ज्यामध्ये वायरसेस, ट्रोजन्स, लॉजिक बाँब्स किंवा अन्य साहित्य असेल जे बदनामीकारक किंवा तांत्रिक दृष्टिने हानीकारक आहे; कोणतेही अनैच्छिक किंवा अनधिकृत जाहिरात, मागणी, प्रचार साहित्य, “जंक मेल,” “स्पॅम,” “चेन लेटर्स,” “पिरामिड योजना,” किंवा आग्रहाचा अन्य कोणताही प्रतिबंधित स्वरुप; कोणत्याही तिसऱ्या पक्षाची कोणतीही खासगी माहिती, यामध्ये पत्ते, फोन क्रमांक, ईमेल पत्ते, क्रमांक आणि वैयक्तिक ओळख दस्तऐवजातील वैशिष्ट्य समाविष्ट असेल (उदा., राष्ट्रीय विमा क्रमांक, पासपोर्ट क्रमांक) किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक; कोणतेही साहित्य जे कोणत्याही कॉपीराईट, ट्रेड मार्क किंवा अन्य बौद्धिक संपदा किंवा कोणत्याही अन्य व्यक्तिच्या खासगीपणा हक्कांवर अतिक्रमण करते किंवा करेल; कोणतेही साहित्य जे कोणत्याही व्यक्तिला बदनामीकारक, अश्लिल, अवमानकारक, द्वेषकारक किंवा प्रक्षोभक असेल; कोणतेही साहित्य जे फौजदारी गुन्हा, धोकादायक कार्ये किंवा स्वयं-हानीसाठी सूचना ठरेल, प्रोत्साहन देईल किंवा पुरवेल; कोणतेही साहित्य जे लोकांना भडकवणे किंवा उत्तेजना देण्यासाठी मुद्दाम तयार केले आहे, विशेषतः ट्रोलींग आणि दादागिरी, किंवा जे लोकांना छळ, इजा, भिती घालणे, संकटात टाकणे, लज्जास्पद किंवा अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने असेल; कोणतेही साहित्य ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची धमकी समाविष्ट असेल, यामध्ये शारीरिक हिंसेच्या धमक्या समाविष्ट असतील; कोणतेही साहित्य जे वंशभेदी किंवा भेदभावात्मक आहे, यामध्ये कोणाचा तरी वंश, धर्म, वय, लिंग, विकलांगता किंवा लैंगिकतेच्या आधारे भेदभाव समाविष्ट आहे;
    • कोणतीही उत्तरे, प्रतिसाद, प्रतिक्रिया, मते, विश्लेषण किंवा शिफारशी ज्यांचा तुम्हाला योग्यरित्या परवाना नाही किंवा अन्यथा पुरविण्यास पात्र नाहीत; किंवा
    • असे साहित्य जे, टिकटॉक च्या सर्वस्वी निर्णयाने, आक्षेपार्ह आहे किंवा जे कोणत्याही अन्य व्यक्तिला या सेवांचा वापर करण्यास निर्बंध किंवा प्रतिबंध करेल, किंवा जे टिकटॉक, या सेवा किंवा त्यांच्या युजर्सना कोणत्याही प्रकारची इजा किंवा उत्तरदायित्वाची बाधा पोहोचवेल.

वरील खेरीज, या सेवांमधील आपला प्रवेश आणि वापर, सदैव, आमच्या समुदाय धोरणाच्या अनुसार असला पाहिजे.

कोणतेही कारण किंवा विनाकारण आमच्या अधिकारात, कोणत्याही वेळी आणि पूर्व सूचनेविना, कंटेंट काढून टाकणे किंवा त्यातील प्रवेश निष्क्रीय करण्याचा अधिकार आम्ही  राखून ठेवला आहे. अशा काही कारणांमध्ये ते कंटेंट आक्षेपार्ह असल्याचे आढळणे, या अटींच्या किंवा आमच्या समुदाय धोरणाचे उल्लंघन करणारे असेल, किंवा अन्यथा या सेवा किंवा युजर्सना हानिकारक असेल तर आम्ही कंटेंट काढून टाकू  किंवा त्यातील प्रवेश निष्क्रीय करू. आमच्या स्वयंचलित यंत्रणा आपल्या कंटेंटचे (ईमेल्ससह) विश्लेषण करतात जेणेकरुन आपल्याला वैयक्तिक सुसंगत उत्पादन वैशिष्ट्ये पुरवतील, जसे गरजेनुसार शोध निष्कर्ष, तयार जाहिरात, आणि स्पॅम आणि मालवेअर शोध. कंटेंट पाठविले, प्राप्त केले, आणि साठवले जात असताना हे विश्लेषण केले जाते.

6. बौद्धिक संपदा हक्क

आम्ही बौध्दिक संपदा हक्कांचा आदर करतो आणि आपणही तसे करावे अशी आमची विनंती आहे. या सेवांमधील प्रवेश आणि वापराची एक अट म्हणून, आपण कोणत्याही बौध्दिक संपदा हक्कांचे उल्लंघन करण्यासाठी या सेवांचा वापर न करण्याचे मान्य करता. आम्ही हा हक्क नोटिसीसह किंवा त्याविना, कोणत्याही वेळी आणि आमच्या सर्वस्वी अधिकारात कोणत्याही युजरच्या खात्यांमध्ये प्रवेश प्रतिबंधित करु आणि/किंवा ती समाप्त करु जे कोणतेही कॉपीराईट्स किंवा अन्य बौध्दिक संपदा हक्कांचे उल्लंघन करतील किंवा उल्लंघन केल्याचा आरोप असेल.

याखेरीज, हा मंच आणि सेवांमधील सर्व कायदेशीर हक्क, मालकी, हित आणि बौध्दिक संपदा (मग ते हक्क नोंदलेले असो किंवा नसो, आणि ते हक्क जगामध्ये कुठेही असले तरी), सर्वस्वी टिकटॉकच्या मालकीची असेल, आणि या अटींमधील कोणतीही गोष्ट आपल्याला टिकटॉकचे कोणतेही व्यापारी नाव, ट्रेडमार्क्स, लोगोज, डोमेन नावे, आणि अन्य ठळक ब्रँड वैशिष्ट्ये यांचा वापर करण्याचा अधिकार आमच्या स्पष्ट आणि पूर्व लेखी संमतीविना कोणत्याही पद्धतीने आपल्याला दिला जात नाही.

7. कंटेंट

A. टिकटॉक कंटेंट

आपण आणि टिकटॉक यांच्या दरम्यान, सर्व कंटेंट, सॉफ्टवेअर, इमेजेस, टेक्स्ट, ग्राफिक्स, उदाहरणे, लोगोज, पेटंट्स, ट्रेडमार्क्स, सेवा चिन्हे, कॉपीराईट्स, छायाचित्रे, ऑडियो, विडीयोज, म्युझिक ऑन आणि या सेवांचा “लुक आणि फिल” आणि त्यांच्याशी निगडीत सर्व बौध्दिक संपदा हक्क ( “टिकटॉक कंटेंट”), एकतर टिकटॉकच्या मालकीचे आहेत किंवा त्यांना परवान्यावर दिले आहेत, त्यांच्याबद्दल समजण्यात येते की आपण किंवा आपले परवानाधारक या सेवांद्वारे आपण अपलोड किंवा संप्रेषित कराल असे कोणतेही युजर कंटेंट (खाली परिभाषित केल्यानुसार) त्यांच्या मालकीचे राहील. या अटींद्वारे स्पष्ट मान्य नसलेल्या कोणत्याही उद्देशांसाठी या सेवांवरील टिकटॉक कंटेंट किंवा साहित्याचा वापर करण्यास सक्त प्रतिबंध आहे. अशा कंटेंटचे डाउनलोड, प्रत, पुननिर्मिती, वितरण, संप्रेषण, प्रसारण, प्रदर्शन, विक्री, परवाना किंवा अन्यथा कोणत्याही उद्देशासाठी विना, किंवा लागू असेल तिथे, आमच्या परवानाधारकाच्या पूर्व लेखी संमतीविना वापरता येणार नाही. आम्ही आणि आमचे परवानाधारक त्यांच्या कंटेंटमध्ये आणि साठी स्पष्ट मंजूर न केलेले सर्व हक्क राखून ठेवत आहोत.

आपण पोहोच देता आणि मान्य करता की आम्ही या सेवांच्या आपल्या वापरातून महसूल निर्माण करु, सद्भभावना वाढवू किंवा अन्यथा आमचे मूल्य वृद्धिंगत करु, यामध्ये उदाहरणाने आणि मर्यादेविना समाविष्ट राहील, जाहिरातीची विक्री, प्रायोजकत्व, प्रचार, डाटा आणि भेटवस्तूंचा वापर (खाली परिभाषित केलेले), आणि या अटींमध्ये आम्ही नेमकी परवानगी दिल्याखेरीज किंवा आपण आमच्यासोबत केलेल्या अन्य करारानुसार, आपल्याला असा महसूल, सद्भावना किंवा कोणतेही मूल्य वाटून घेण्याचा कोणताही अधिकार नसेल. आपण पुढे पोहोच देता की, या अटींमध्ये आमच्याद्वारे नेमकेपणाने परवानगी दिल्याखेरीज किंवा आपण आमच्यासोबत केलेल्या अन्य करारानुसार, आपल्याला (i) कोणतेही युजर कंटेंट (खाली परिभाषित केलेले) किंवा कोणतेही संगीतिक कार्य, ध्वनी मुद्रण किंवा दृकश्राव्य क्लिप्सचा आपण केलेला वापर आपल्याला या सेवांवर किंवा द्वारे उपलब्ध केलेला असेल, यामध्ये आपण तयार केलेले कोणतेही युजर कंटेंट समाविष्ट असेल त्यावर अधिकार राहणार नाही, आणि (ii) या सेवांच्या किंवा कोणत्याही अन्य तिसऱ्या पक्षाच्या सेवेच्या अंतर्गत कोणतेही युजर कंटेंटवर पैसे कमावणे किंवा विचारार्थ प्राप्त करणेस प्रतिबंध राहील (उदा., आपण युट्युबसारख्या सोशल मीडिया मंचावर पैसे कमविण्यासाठी केलेल्या युजर कंटेंटवर दावा करु शकणार नाही).

या अटींच्या नियम आणि अटींच्या अधीन, आपल्याला या सेवांमध्ये प्रवेश आणि वापर करण्याचा एक अ-विशिष्ट, मर्यादित, अ-हस्तांतरणीय, अ-उपपरवानायोग्य, मागे घेण्यायोग्य, विश्वव्यापी परवाना याद्वारे मंजूर करण्यात येत आहे, यामध्ये एका परवानाप्राप्त उपकरणावर डाउनलोड करणे, आणि टिकटॉक कंटेंट सर्वस्वी आपल्या वैयक्तिक, अ-व्यापारी वापरासाठी या सेवांद्वारे आपण केलेला वापर आणि या अटींचे सर्वस्वी अनुपालन करणे समाविष्ट आहे. या सेवा आणि टिकटॉक कंटेंटमध्ये स्पष्टपणे मंजुरी नसलेले सर्व हक्क टिकटॉकने राखून ठेवले आहेत. आपण पोहोच देता आणि मान्य करता की टिकटॉक हा परवाना कोणतेही कारण न देता किंवा विनाकारण हा परवाना समाप्त करु शकतात.

ध्वनी मुद्रणे आणि संगीतिक कामांच्या संदर्भात अंतर्भूत कोणतेही हक्कांचा परवाना या सेवेमधून किंवा द्वारे उपलब्ध केलेला नाही.

आपण पोहोच देता आणि मान्य करता की या सेवांवर इतरांनी दिलेले कंटेंट आपण पाहता तेव्हा, आपण ते स्वतःच्या जोखीमेवर करत असता. आमच्या सेवांवरील कंटेंट केवळ सर्वसाधारण माहितीसाठी दिले जाते. आपण अवलंबून राहिले पाहिजे असा सल्ला देण्याचा यात उद्देश नाही. आपण आमच्या सेवांवरील कंटेंटच्या आधारे कोणतीही कृती करण्यापूर्वी, किंवा कृतीपासून दूर राहण्यासाठी व्यवसायिक किंवा तज्ञ सल्ला प्राप्त केला पाहिजे.

कोणतेही टिकटॉक कंटेंट (युजर कंटेंटसह) अचूक, संपूर्ण किंवा अद्ययावत असल्याचे आम्ही कोणतेही सादरीकरण, वॉरंटी किंवा गॅरंटी देत नाही. आमच्या सेवांमध्ये जिथे तिसऱ्या पक्षांद्वारे दिलेल्या अन्य साईट्स आणि स्रोतांच्या लिंक्स समाविष्ट असतील तिथे, या लिंक्स आपल्याला केवळ माहितीसाठी दिलेल्या आहेत. या साईट्स किंवा साधनस्रोतांच्या कंटेंट्सवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. अशा लिंक्स म्हणजे त्या संलग्न वेबसाईट्स किंवा आपण प्राप्त कराल त्या माहितीला आम्ही दिलेली मंजुरी आहे असा अर्थ घेऊ नये. आपण पोहोच देता की आपण आणि या सेवांचे अन्य युजर्स यांनी (युजर कंटेंटसह) पोस्ट केलेले कोणतेही कंटेंट प्री-स्क्रिन, संनियंत्रण, आढावा, किंवा संपादित करण्याचे कोणतेही दायित्व आमच्यावर नाही.

B. युजरद्वारे-निर्मित कंटेंट

या सेवांच्या युजर्सना या सेवांद्वारे कंटेंट अपलोड, पोस्ट किंवा संप्रेषित करणे (जसे एखाद्या स्ट्रीमद्वारे) किंवा अन्यथा कंटेंट उपलब्ध करण्यास परवानगी राहील यामध्ये, मर्यादेविना समाविष्ट असेल, कोणतेही टेक्स्ट, छायाचित्रे, युजर विडीयोज, ध्वनीमुद्रणे आणि त्यात अंतर्भूत म्युझिकल कामे, यामध्ये असे विडीयोज समाविष्ट असतील ज्यामध्ये स्थानिक पातळीवर जतन केलेले ध्वनीमुद्रण आपल्या वैयक्तिक संगीत ग्रंथालयामधून आणि आसपासचा आवाज (“युजर कंटेंट”) समाविष्ट असेल. या सेवांचे युजर्स अन्य युजरने तयार केलेल्या युजर कंटेंटचा सर्व किंवा कोणताही भाग देखील काढून अतिरिक्त युजर कंटेंट निर्माण करु शकतात, यामध्ये अन्य युजर्ससोबत सहयोगी युजर कंटेंट समाविष्ट असेल, ज्यामध्ये एकाहून अधिक युजरने तयार केलेल्या युजर कंटेंटचा संयोग आणि विवरण राहील. या सेवांचे युजर्स टिकटॉकने ("बायटेन्स इलेमेंट्स") दिलेल्या संगीत, ग्राफिक्स, स्टिकर्स, वर्चुअल आयटम्स ("वर्चुअल आयटम धोरण" यामध्ये परिभाषित आणि अधिक स्पष्टीकरण केलेले) युजर कंटेंटवर आवरित करु शकतात आणि हे युजर कंटेंट या सेवांद्वारे हे युजर कंटेंट संप्रेषित करु शकतात. टिकटॉक इलेमेंट्स समाविष्ट असलेल्या युजर कंटेंटसह, युजर कंटेंटमधील माहिती आणि साहित्य आमच्याद्वारे सत्यापित किंवा मंजूर केलेले नाही. या सेवांवरील अन्य युजर्सद्वारे व्यक्त मते (वर्चुअल भेटींच्या वापराद्वारे यासह) ही आमची मते किंवा मूल्ये नाहीत.

या सेवांद्वारे युजर कंटेंट अपलोड किंवा संप्रेषित करु देणारे एखादे वैशिष्ट्य आपण घेता किंवा वापरता (यामध्ये ठराविक तृतिय पक्षी सोशल मीडिया मंच समाविष्ट आहेत जसे की इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब, ट्विटर यासह), किंवा या सेवांच्या अन्य युजर्ससोबत संपर्क करण्यासाठी, आपण वरील “आमच्या सेवांमधील आपला प्रवेश आणि वापर” मध्ये नमूद मानदंडांचे पालन केले पाहिजे. आपण टिकटॉक इलेमेंट्ससह युजर कंटेंटसह, आपले युजर कंटेंट, तिसऱ्या पक्षांच्या साईट्स किंवा मंचांवर अपलोड किंवा संप्रेषित करण्याची निवड करु शकता. आपण हे करण्याचे ठरविले तर, आपण कंटेंट मार्गदर्शक सूचनांचे तसेच वरील “आमच्या सेवांमधील आपला प्रवेश आणि वापर” मधील मानदंडांचे पालन केले पाहिजे.

आपण वॉरंट देता की अशा कोणतेही योगदान त्या मानदंडांच्या अनुसार असले पाहिजे, आणि या वॉरंटीचे कोणतेही उल्लंघनासाठी आपण आम्हाला उत्तरदायी राहाल आणि आम्हाला क्षतिपूर्तता कराल. याचा अर्थ वॉरंटीचे आपल्याद्वारे उल्लंघनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही हानी किंवा नुकसानासाठी आपण जबाबदार राहाल.

कोणतेही युजर कंटेंट अ-गोपनीय आणि गैर-प्रोप्रायटरी समजण्यात येईल.  आपण या सेवांवर किंवा द्वारे कोणतेही युजर कंटेंट पोस्ट करता कामा नये किंवा आम्हाला कोणतेही युजर कंटेंट संप्रेषित करु नये जे आपल्या मते गोपनीय किंवा प्रोप्रायटरी असेल. आपण या सेवांद्वारे युजर कंटेंट सादर करता तेव्हा, आपण मान्य आणि सादर करता की आपण त्या युजर कंटेंटचे मालक आहात, किंवा आपल्याला सर्व आवश्यक परवानगी, मंजुरी, त्या कटेंटच्या कोणत्याही भागाच्या मालकाकडून या सेवांसाठी सादर करण्याची, या सेवांवरुन अन्य तिसऱ्या मंचांवर ते संप्रेषित करण्याची, आणि/किंवा कोणतेही तृतिय पक्षी कंटेंट स्विकारण्याचा अधिकार मिळाला आहे.

आपण एखाद्या ध्वनी मुद्रणातील आणि साठी केवळ हक्कांची मालकी आपल्याकडे असेल, परंतु अशा ध्वनी मुद्रणात अंतर्भूत संगीतिक कामांची मालकी नसेल तर, आपण असे ध्वनी मुद्रण, त्याच्या कोणत्याही भागाच्या मालकाकडून सर्व मंजुरी, परवानगी, किंवा अधिकार असल्याखेरीज या सेवांवर सादर करण्यासाठी पोस्ट करु नये.

आपण किंवा आपल्या युजर कंटेंटचे मालक यांच्याकडे युजर कंटेंटमधील कॉपीराईट अद्याप असतील, परंतु या सेवांद्वारे युजर कंटेंट सादर करुन, आपण याद्वारे आम्हाला विनाशर्त अपरिवर्तनीय, अ-विशिष्ट, स्वामित्व शुल्कमुक्त, पूर्णपणे हस्तांतरणीय, जागतिक परवाना देता ज्याद्वारे युजर कंटेंटमध्ये सुधारणा, अधिग्रहण, पुननिर्मिती करणे, त्यातून उप-कार्य तयार करणे, प्रकाशित आणि/किंवा संप्रेषित करणे, आणि/किंवा वितरित करणे आणि या सेवांच्या अन्य युजर्सना आणि तृतिय पक्षांना आपले युजर कंटेंट पाहणे, प्रवेश, वापर, डाउनलोड, सुधारणा, अधिग्रहण, पुननिर्मिती करणे, त्यातून उप-कार्य तयार करणे, प्रकाशित आणि/किंवा आपले युजर कंटेंट कोणत्याही स्वरुपात आणि कोणत्याही मंचावर संप्रेषित करणे, जो एकतर ज्ञात असेल किंवा इथून पुढे शोधला जाणार असेल.

आपण यानंतर आम्हाला आपले युजर नेम, इमेज, आवाज, आणि आवडी यांचा वापर करण्यास कॉपीराईट-मुक्त परवाना देत आहात जो कोणत्याही युजर कंटेंटचा स्रोत म्हणून आपली ओळख पटवण्यास वापरला जाईल.

शंका टाळण्यासाठी, या विभागाच्या आधीच्या परिच्छेदांमध्ये मंजूर हक्कांमध्ये, मर्यादेविना समाविष्ट आहेत, ध्वनी मुद्रणांची पुन्हा निर्मिती करण्याचा हक्क (आणि अशा ध्वनी मुद्रणांमध्ये अंतर्भूत संगीतिक कामांची यांत्रिक पुन्हा निर्मिती करणे), आणि ध्वनी मुद्रणांचे जाहीर सादरीकरण आणि लोकांसोबत संवाद (आणि त्यामध्ये अंतर्भूत म्युझिकल कार्य), सर्व कॉपीराईट शुल्क-मुक्त तत्वावर करणे. याचा अर्थ आपण आपले युजर कंटेंट आम्हाला वापरण्याचा हक्क मंजूर करत आहात आणि त्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षास कॉपीराईट शुल्क देण्याचे दायित्व नसेल, यामध्ये मर्यादेविना समाविष्ट असेल, एक ध्वनीमुद्रण कॉपीराईट मालक (उदा. एक रेकॉर्ड लेबल), एक संगीतिक कार्य कॉपीराईट मालक (उदा., एक संगीत प्रकाशक), एक सादरीकरण हक्क संघटना (म्हणजे, ASCAP, BMI, SESAC, इ.) (एक “PRO”), एक ध्वनी मुद्रण PRO (उदा., साउंडएक्सचेंज), कोणत्याही संघटना किंवा गिल्ड्स, आणि इंजिनियर्स, निर्माते किंवा युजर कंटेंट निर्मितीमध्ये सामील अन्य रॉयल्टी सहभागी.

कोणत्याही युजर-निर्मित कंटेंटची संपूर्णता, सत्यता, अचूकता, किंवा विश्वासार्हता यांना आम्ही समर्थन, आधार, प्रतिनिधीत्व किंवा हमी देत नाही किंवा त्यात व्यक्त कोणत्याही मतांचे समर्थन करीत नाही. आपण जाणता की या सेवा वापरुन, आपण अशा कंटेंटच्या संपर्कात येऊ शकता जे अवमानकारक, हानीकारक, चुकीचे किंवा अन्यथा अयोग्य आहे, किंवा काही प्रकरणी, चुकीचे लेबल दिलेल्या किंवा अन्यथा फसवणाऱ्या पोस्टींग्ज. सर्व कंटेंट हे त्याच्या मूळ निर्मात्याची सर्वस्वी जबाबदारी राहील.

संगीतिक कार्य आणि ध्वनीमुद्रक कलाकारांसाठी विशिष्ट नियमः आपण एखाद्या संगीतिक कार्याचे संयोजक किंवा लेख असाल आणि एका PRO सोबत संलग्न असाल तर, आपल्या युजर कंटेंटद्वारे आपण आम्हाला मंजूर केलेल्या कॉपीराईट शुल्क-मुक्त परवान्याची सूचना आपल्या PRO ला द्यावी. संबंधित PRO च्या सूचना उत्तरदायित्वांचे पालन करण्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार आहात. जर आपण आपले हक्क एखाद्या संगीत प्रकाशकाला नेमून दिले असतील तर, आपण आपल्या युजर कंटेंटमध्ये या अटींमध्ये कॉपीराईट शुल्क-मुक्त परवाना(ने) मंजूर करण्यासाठी अशा संगीत प्रकाशकाची संमती प्राप्त केली पाहिजे किंवा अशा संगीत प्रकाशकाने आमच्यासोबत या अटी केल्या पाहिजेत. आपण एखाद्या संगीतिक कार्याचे लेखन केले (उदा. एक गाणे लिहिले) म्हणून केवळ या अटींखाली आम्हाला परवाने मंजूर करण्याचा आपल्याला अधिकार आहे असे नाही. आपण एका रेकॉर्ड लेबलसह कंत्राटाखाली एक ध्वनीमुद्रण कलाकार असाल तर, आपल्या रेकॉर्ड लेबलसाठी असलेल्या कोणत्याही कंत्राटी दायित्वांचे पालन करुन आपण या सेवांचा वापर करण्याची खात्री करण्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहात, यामध्ये आपल्या लेबलद्वारे दावा केले जातील अशा सेवांद्वारे आपण निर्माण केलेले कोणतेही नवे ध्वनीमुद्रण समाविष्ट राहील.

थ्रू-टू-द-ऑडियन्स हक्क. या अटींमध्ये आपल्या युजर कंटेंटमध्ये आपण मंजूर केलेले सर्व हक्क थ्रू-टू-द-ऑडियन्स तत्वावर दिले जातील, याचा अर्थ तृतिय पक्षी सेवांचे मालक किंवा संचालक यांच्यावर आपल्यावर कोणतेही स्वतंत्र उत्तरदायित्व नसेल किंवा या सेवांद्वारे अशा तिसऱ्या पक्षांवर पोस्ट केलेले किंवा वापरलेल्या युजर कंटेंटसाठी कोणताही तिसऱ्या पक्षावर नसेल.

युजर कंटेंटसाठी हक्क माफी. या सेवांवर किंवा द्वारे युजर कंटेंट पोस्ट करण्याद्वारे, आपण अशा युजर कंटेंटशी निगडीत कोणतेही विपणन किंवा प्रचारात्मक साहित्याची पूर्व तपासणी किंवा मंजुरीसाठी कोणतेही हक्क माफ करत आहात. आपले युजर कंटेंट, किंवा त्याचा कोणताही भाग यांच्याशी निगडीत समान स्वरुपाचे खासगीपणा, प्रचार, किंवा कोणतेही अन्य आणि सर्व हक्क देखील आपण माफ करत आहात. कोणतेही नैतिक हक्क हस्तांतरणीय किंवा नियुक्त करण्यायोग्य नसतील त्या प्रमाणात, आपण याद्वरे कोणतेही आणि सर्व नैतिक हक्क वापरण्यास माफी आणि मान्यता देत आहात, किंवा या सेवांसाठी किंवा द्वारे आपण पोस्ट केलेल्या कोणत्याही युजर कंटेंटमध्ये किंवा द्वारे आपल्याला असलेल्या कोणत्याही नैतिक हक्कांच्या आधारे कोणत्याही कृतीला समर्थन देता, ती राखता किंवा परवानगी देता.

आमच्या सेवांसाठी आपण पोस्ट किंवा अपलोड केलेल्या कोणत्याही युजर कंटेंटमुळे कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या बौध्दिक संपदा हक्कांचे, किंवा त्यांच्या खासगीपणा हक्काचे उल्लंघन झाल्याचा दावा झाल्यास आपली ओळख त्यांना देण्याचा देखील हक्क आम्हाला राहील.

आम्ही, किंवा अधिकृत तिसरे पक्ष, आमच्या किंवा त्यांच्या सर्वस्वी अधिकारात आपले कंटेंट कट, क्रॉप, एडिट करणे किंवा प्रकाशन नाकारण्याचा हक्क राखून ठेवत आहोत. वरील “आमच्या सेवांमधील आपला प्रवेश आणि वापर” यामध्ये नमूद केलेल्या कंटेंट मानदंडांसोबत आपली पोस्ट, आमच्या मते नसेल तर आमच्या सेवांवर आपण केलेले कोणतेही पोस्टींग काढून टाकणे, नामंजूर करणे, ब्लॉक किंवा डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला आहे. याखेरीज, आम्हाला कोणतेही युजर कंटेंट काढून टाकणे, मंजूर न करणे, ब्लॉक किंवा डिलीट करण्याचा आमच्या सर्वस्वी मर्जीने हक्क आहे – परंतु दायित्व नाही - (i) जे आमच्या मते या अटींचे उल्लंघन करते, किंवा (ii) अन्य युजर्स किंवा तिसऱ्या पक्षांकडून तक्रारींना प्रतिसाद म्हणून, नोटिसीसह किंवा त्याविना आणि आपल्यावर कोणत्याही उत्तरदायित्वाविना काढून टाकले जाईल. परिणामी, आम्ही शिफारस करतो की अशा युजर कंटेंच्या प्रति आपण स्थायी स्वरुपात घेऊ शकाल याची खात्री करायची असेल तर आपल्या वैयक्तिक उपकरणा(णां)वर या सेवांवर आपण पोस्ट केलेल्या कोणत्याही युजर कंटेंटच्या प्रती आपण साठवून ठेवाव्यात. आम्ही कोणत्याही युजर कंटेंटची अचूकता, निष्ठा, सुयोग्यता किंवा गुणवत्ता यांची हमी देत नाही, आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोणत्याही युजर कंटेंटसाठी कोणत्याही प्रकारे उत्तरदायी नाही.

सेवांच्या सर्व अन्य युजर्सना या सेवांवर आपले युजर कंटेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध करायचे की केवळ आपल्या मर्जीतील लोकांना करायचे याचे नियंत्रण आपण कराल. आपल्या युजर कंटेंटमधील प्रवेश निर्बंधित करण्यासाठी, आपण या मंचावर उपलब्ध खासगीपणा सेटिंग निवडावे.

युजर्सनी सादर केलेल्या आणि आम्ही किंवा अधिकृत तिसऱ्या पक्षांनी सादर केलेल्या कोणत्याही कंटेंटच्या बाबत आम्ही उत्तरदायित्व स्विकारत नाही.

अन्य युजर्सनी अपलोड केलेली माहिती आणि साहित्याबद्दल आपण तक्रार करु इच्छित असाल तर कृपया आम्हाला या पत्त्यावर संपर्क  साधा: https://www.tiktok.com/legal/report/feedback

आमच्या जाणिवेत येईल असे कोणतेही उल्लंघन कऱणारे साहित्य आमच्या सेवांमधून तातडीने काढून टाकण्यासाठी टिकटॉक योग्य ते उपाय करेल. इतरांचे कॉपीराईट्स किंवा बौध्दिक संपदा हक्कांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या युजर्सची खाती या सेवांमधून निष्क्रीय किंवा समाप्त करणे हे, योग्य प्रसंगात आणि आपल्या अधिकारात करणे, टिकटॉकचे धोरण आहे.

आमचे स्वतःचे कर्मचारी आमच्या स्वयं उत्पादन कल्पना आणि वैशिष्ट्यांचा विकास आणि मूल्यांकन सातत्याने करत असतात तर, युजर समुदायाकडून मिळणाऱ्या आवडी, अभिप्राय, प्रतिक्रिया, आणि सूचना यांच्याकडे बारकाईन लक्ष देण्याबाबत आम्ही अभिमान बाळगतो. आपण आम्हाला किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना उत्पादने, सेवा, वैशिष्ट्ये, सुधारणा, वृध्दि, कंटेंट, रिफाईनमेंट्स, तंत्रज्ञान, कंटेंट ऑफरिंग्ज (जसे की ऑडियो, विज्युअल, गेम्स, किंवा अन्य प्रकारचे कंटेंट), प्रचार, धोरणे, किंवा उत्पादन/वैशिष्ट्यांची नावे, किंवा कोणतेही संबंधित दस्तऐवज, आर्टवर्क, काँप्युटर कोड, चित्रे, किंवा अन्य साहित्य (एकत्रितपणे “अभिप्राय”) पाठवून योगदान देऊ इच्छित असाल तर खालील अटी लागू होतील, जेणेकरुन भविष्यातील गैरसमज टाळता येतील. त्यानुसार, आम्हाला अभिप्राय पाठवून, आपण मान्य करता की:

i. आपला अभिप्रायाचा आढावा, विचार, किंवा अंमलबजावणी करण्याचे, किंवा कोणत्याही कारणास्तव कोणताही अभिप्राय पूर्णतः किंवा अंशतः आपल्याला परत पाठविण्याचे दायित्व टिकटॉकवर नाही;

ii. अभिप्राय हा अ-गोपनीय तत्वावर दिला जातो, आणि आपण पाठविलेला कोणताही अभिप्राय गोपनीय ठेवणे किंवा तो कोणत्याही प्रकारे वापरणे किंवा प्रकट करण्यास कोणत्याही दायित्वाखाली नाही; आणि

iii. आपण आम्हाला अपरिवर्तनीय कायमस्वरुपी आणि अमर्याद परवानगी मंजूर करता ज्याद्वारे आम्ही या अभिप्रायाची पुननिर्मिती, वितरण, त्यातून उप-कामे तयार करणे, जाहीर सादरीकरण (थ्रू-टू-द ऑडियन्स तत्वासह), लोकांना सूचित करणे, उपलब्ध करणे, जाहिर प्रदर्शन आणि अन्यथा त्याचा आणि त्याची उप-कामे यांचा वापर आणि उपभोग घेणे ही कामे आम्ही कोणत्याही उद्देशाने आणि विना निर्बंध, विना शुल्क आणि कोणत्याही स्वरुपाची पोहोच न देता करु शकू, यामध्ये तो अभिप्राय समाविष्ट किंवा अंतर्भूत करुन व्यापारी उत्पादने आणि सेवा तयार करणे, विकणे, विकण्यास देणे, आयात करणे, आणि प्रचार करणे शक्य होईल, मग तो संपूर्ण किंवा अंशतः असेल, आणि दिल्यानुसार किंवा सुधारित केल्यानुसार असेल.

8. क्षतिपूर्ती

या अटींचा आपण किंवा आपल्या खात्याच्या कोणत्याही युजरद्वारे भंग करण्याद्वारे किंवा या अटींखालील आपले दायित्व, सादरीकरण आणि वॉरंटीच्या भंगातून उद्भवणाऱे कोणतेही आणि सर्व दावे, उत्तरदायित्व, किंमती, आणि खर्च, मर्यादेविना, वकिलांचे शुल्क आणि खर्च, यांच्यापासून टिकटॉक, त्यांचे पालक, उपकंपन्या, आणि सहयोगी, आणि त्यांचे प्रत्येक संबधित अधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट्स आणि सल्लागार यांना समर्थन, क्षतिपूर्ती, आणि हानीरहित ठेवण्याचे आपण मान्य करत आहात.

9. वॉरंटीचे अपवर्जन

एक ग्राहक म्हणून आपल्याला असलेल्या कोणत्याही वैधानिक हक्कांना या अटींमधील कोणतीही गोष्ट बाधित करणार नाही जी आपण बदलणे किंवा माफ करण्यास कंत्राटाद्वारे मान्य करु शकत नाही आणि कायद्याने ज्यास आपण सदैव पात्र आहात. या सेवा “आहेत तशा” पुरविलेल्या आहेत आणि त्यांच्या बाबतीत आम्ही आपल्याला कोणतीही वॉरंटी किंवा सादरीकरण करीत नाही. विशेषतः आम्ही आपल्याला सादर किंवा वॉरंट करीत नाही की:

  • या सेवांचा आपण केलेला वापर आपल्या गरजा पूर्ण करेल;
  • या सेवांचा आपण केलेला वापर अखंडित, वेळेवर, सुरक्षित आणि त्रुटीमुक्त असेल; या सेवांच्या वापरातून आपण प्राप्त केलेली कोणतीही माहिती अचूक किंवा विश्वासार्ह असेल; आणि
  • या सेवांचा भाग म्हणून आपल्याला दिलेल्या कोणत्याही सॉफ्टवेअरचे कार्य किंवा फंक्शनॅलिटी दुरूस्त केली जाईल.

या सेवांना कोणत्याही अटी, वॉरंटीज किंवा अन्य अटी लागू नाहीत (यामध्ये समाधानकारक गुणवत्ता, उद्देशासाठी योग्यता किंवा वर्णनानुसार असण्यासह) केवळ त्या प्रमाणाखेरीज जिथे या अटींमध्ये त्या स्पष्ट नमूद केलेल्या आहेत. आम्ही नोटिशीविना कोणत्याही वेळी व्यवसाय आणि कार्यान्वयन कारणांसाठी आमच्या मंचाची सर्व किंवा कोणत्याही भागाची उपलब्धता बदलू शकतो, स्थगित करु शकतो, काढून घेऊ किंवा निर्बंधित करु शकतो.

10. उत्तरदायित्वाची मर्यादा

लागू कायद्याने अपवर्जित किंवा मर्यादित नसतील अशा आमच्या उत्तरदायित्वाला या अटींमधील कोणतीही गोष्ट अपवर्जित किंवा मर्यादित करु शकणार नाही. यामध्ये आमच्या हलगर्जीपणामुळे किंवा आमचे कर्मचारी, एजंट्स किंवा उप-कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा धोकेबाज सादरीकरणाने झालेल्या झालेला मृत्यु किंवा वैयक्तिक इजा यासाठीचे उत्तरदायित्व समाविष्ट आहे.

वरील परिच्छेदाच्या अधीन, आम्ही आपल्याला यासाठी उत्तरदायी राहणार नाही:

(I) नफ्याचे नुकसान (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेले); (II) सद्भावनेची हानी; (III) संधीची हानी; (IV) आपल्याला झालेली डाटाची हानी; किंवा (V) आपल्याद्वारे झालेले कोणतेही थेट किंवा परिणामतः तोटे. अन्य कोणतीही हानी आपण टिकटॉकला मागील 12 महिन्यात दिलेल्या रक्कमेपुरती मर्यादित राहील.

पुढील परिणामी आपल्याला होणारी कोणतीही हानी किंवा नुकसान:

  • कोणत्याही जाहिरातीचा संपूर्णपणा, अचूकता किंवा अस्तित्वावर आपण दाखविलेला कोणताही विश्वास, किंवा आपण आणि कोणताही जाहिरातदार यांच्या दरम्यान कोणतेही नाते किंवा व्यवहाराच्या परिणामी आणि कोणताही जाहिरातदार किंवा प्रायोजक ज्यांची जाहिरात या सेवेवर प्रदर्शित असेल;
  • कोणतेही बदल जे आम्ही या सेवांमध्ये करु, किंवा कोणत्याही स्थायी किंवा तात्पुरत्या सेवा पुरवठ्यातील खंड (किंवा सेवांतर्गत कोणतेही वैशिष्ट्य);
  • या सेवांच्या वापराद्वारे आपण राखलेल्या किंवा संप्रेषित केलेल्या कोणत्याही कंटेंट आणि अन्य संवाद काढून टाकणे, भ्रष्ट होणे, किंवा साठविले न जाणे;
  • अन्य युजरची कोणतीही कृती किंवा वर्तन;
  • आम्हाला अचूक खाते माहिती देण्यातील आपले अपयश;
  • किंवा आपला पासवर्ड किंवा खाते तपशील सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यातील आपले अपयश.

कृपया नोंद घ्या की आम्ही आमचा मंच केवळ स्थानिक आणि खासगी वापरासाठी देतो. आपण मान्य करता की आपण आमचा मंच कोणत्याही व्यापारी किंवा व्यवसाय उद्देशांसाठी वापरणार नाही, आणि नफ्यातील तोटा, व्यवसायाची हानी, सद्भावनेची किंवा व्यवसाय प्रतिष्ठेची हानी, व्यवसायातील खंड, किंवा व्यवसाय संधीची हानी यासाठी आमच्यावर कोणतेही दायित्व नसेल.

आम्ही पुरविलेल्या सदोष डिटिजल कंटेंटमुळे आपले एखादे उपकरण किंवा डिजिटल कंटेंटचे नुकसान झाले आणि व्यवहार्य निगा आणि कौशल्य वापरण्यातील आमच्या अपयशामुळे ते झाले असेल तर, आम्ही एकतर ते नुकसान दुरूस्त करु किंवा आपल्याला भरपाई देऊ. परंतु, आपल्याला मोफत दिलेल्या अपडेटचा वापर करण्याचा आमचा सल्ला आपण टाळल्यामुळे किंवा इन्स्टॉलेशन सूचनांचे अचूक पालन न केल्यामुळे किंवा आम्ही सुचविल्यानुसार किमान सिस्टीम आवश्यकता न राखल्याने टाळता येणारे नुकसान झाल्यास आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. 

आपल्याप्रती उत्तरदायित्वावरील या मर्यादा आम्हाला अशी कोणतीही हानी होण्याबाबत सूचना देण्यात आली असेल किंवा नसेल किंवा आम्ही त्याबद्दल जागरुक नसलो तरी लागू राहतील.

आमच्या सेवा आपण वापरण्यासाठी लागू होणारे कोणतेही मोबाईल शुल्क ही आपली जबाबदारी असेल, यामध्ये टेक्स्ट-मेसेजिंग आणि डाटा शुल्क समाविष्ट असेल. असे शुल्क काय असेल याची आपल्याला खात्री नसेल तर, आपण ही सेवा वापरण्यापूर्वी आपल्या सेवा पुरवठादाराला विचारावे.

कायद्याने मान्य संपूर्ण प्रमाणात, या सेवांच्या आपल्या वापरातून कोणत्याही तिसऱ्या पक्षासोबत आपल्याला असलेला कोणताही तंटा, यामध्ये उदाहरणाने आणि मर्यादेविना समाविष्ट असेल, कोणतेही कॅरियर, कॉपीराईट स्वामी किंवा अन्य युजर,हा थेट आपण आणि अशा तिसऱ्या पक्षादरम्यान असेल, आणि आपण अशा तंट्यातून उद्भवणारे सर्व प्रकार आणि स्वरुपाचे, ज्ञात आणि अज्ञात सर्व दावे, मागण्या आणि नुकसान (प्रत्यक्ष आणि प्रासंगिक) यांच्यापासून आम्हाला आणि आमच्या सहयोगींना स्पष्टपणे मुक्त ठेवाल.

11.अन्य अटी

a. लागू कायदा आणि अधिकार क्षेत्र. पूरक अटींच्या अधीन – या अटी, त्यांची विषय वस्तू आणि त्यांची निर्मिती, भारताच्या कायद्याने संचालित आहेत. या अटींच्या मधून किंवा संदर्भात उद्भवणारा कोणताही तंटा, यामध्ये या अटींचे अस्तित्व, वैधता किंवा समाप्तीबाबत कोणत्याही प्रश्नासह, सध्या लागू असलेल्या आर्बिट्रेशन  व कन्सिलेशन ॲक्ट, १९९६ च्या तरतुदींनुसार मध्यस्थीकडे पाठविले जातील आणि अंततः सोडवले जातील, व त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातील. या मध्यस्थीचे स्थान दिल्ली राहील. 

या लवादात तीन (3) मध्यस्थ राहतील. या मध्यस्थीची भाषा इंग्लिश राहील.

b. मुक्त स्रोत. या मंचावर ठराविक मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहेत. ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा प्रत्येक आयटम त्याच्या स्वतःच्या लागू अटींच्या अधीन आहे, ज्या ओपन सोर्स धोरणामध्ये मिळू शकतात.

c. संपूर्ण करार. या अटी (खालील पूरक अटींसह) आपण आणि टिकटॉक यांच्या दरम्यान संपूर्ण कायदेशीर करार ठरतात आणि या सेवांच्या वापराचे संचालन करतात आणि या सेवांच्या संदर्भात आपण आणि टिकटॉक यांच्या दरम्यान कोणत्याही पूर्वीच्या कराराची संपूर्ण जागा घेतात.

d. लिंक्स. आपण आमच्या होम पेजसोबत लिंक करु शकता, तथापि आपण हे काम निष्पक्ष आणि कायदेशीर पद्धतीने कराल आणि आमच्या प्रतिष्ठेचे नुकसान करणार नाही किंवा त्याचा गैरफायदा घेणार नाही. आपण एखादी लिंक अशाप्रकारे स्थापित करणार नाही जेणेकरुन कोणत्याही स्वरुपाचे संबंध, मान्यता किंवा समर्थन आमच्या वतीने सूचित होईल परंतु ते प्रत्यक्षात नसेल. आपल्या मालकीच्या नसलेल्या कोणत्याही वेबसाईटमध्ये आमच्या सेवांची लिंक आपण स्थापित करु नये. आपण लिंक करत असलेली वेबसाईट वरील “आमच्या सेवांमधील आपला प्रवेश आणि वापर” यामध्ये नमूद कंटेंट मानदंडांचे पूर्णतः पालन करणारी असली पाहिजे. आम्ही सूचनेविना लिंकींग परवानगी काढून घेण्याचा हक्क राखून ठेवत आहोत.

e. वयाची मर्यादा. या सेवा 13 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी आहेत(जास्तीच्या मर्यादा सप्लिमेंटल टर्म्स-ज्युरिसडिक्शन-स्पेसिफिक मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे असू शकतील). या सेवा वापरुन, आपण पुष्टि करता की आपण इथे नमूद वयाहून अधिक वर्षांचे आहात. जर आम्हाला समजले की कोणीतरी वर उल्लेखित वयापेक्षा कमी वयाची व्यक्ति या सेवांचा वापर करत आहे, तर आम्ही त्या युजरचे खाते बंद करुन टाकू.

f. कोणतीही माफी नाही. या अटींमधील कोणत्याही तरतुदीचा आग्रह किंवा लागू करण्यात आमचे अपयश हे कोणतीही तरतूद किंवा हक्काची माफी असे समजू नये.

g. सुरक्षितता. आमच्या सेवा सुरक्षित किंवा बग्ज किंवा व्हायरसपासून सुरक्षित असतील अशी हमी आम्ही देत नाही. आमच्या सेवा घेण्यासाठी आपले माहिती तंत्रज्ञान, काँप्युटर कार्यक्रम आणि मंच कॉन्फीगर करण्यास आपण जबाबदार आहात. आपण स्वतःचे व्हायरस संरक्षण सॉफ्टवेअर वापरले पाहिजे.

h. विभक्तता. या प्रकरणी निर्णय देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही न्यायालयाने, या अटींची कोणतीही तरतूद अवैध आहे असा निर्णय दिला तर, उर्वरित अटींना बाधा न पोहोचवता ती तरतूद काढून टाकण्यात येईल, आणि या अटींच्या उर्वरित तरतुदी वैध आणि लागू करण्यास योग्य अशा स्वरुपात चालू राहतील.

भारतासाठी तक्रार निवारण अधिकारी

आमच्या उत्पादनाची युजरची तक्रार किंवा समस्या खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता किंवा ईमेल द्वारे पाठवू शकता. या तक्रारी मध्ये दिलेले असले पाहिजेः १) त्या संबंधित खातेधारकाचे युजर नाव, २) ज्या विशिष्ट कंटेंट /व्हिडिओ विषयी शंका आहे तो, ३)अशी लेखी नोंद करण्याच्याविनंती मागील कारण(णे).

माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमां च्या अन्वये, तक्रारनिवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा तपशील खाली दिलेला आहेः

श्री. अनुज भाटिया

ईमेलः grievance.officer@tiktok.com

त्याचबरोबर, तुम्ही कोणत्याही प्रश्न निर्माण करणाऱ्या कंटेंट विषयी ॲपवरील कंटेंट फिचर रिपोर्टचा वापर करून सुध्दा कंटेंट रिपोर्ट करू शकता.

सप्लिमेंटल टर्म्स-ज्युरिसडिक्शन-स्पेसिफिक

भारत. जर तुम्ही भारतात आमच्या सेवा वापरत आहात, तर खालील अतिरिक्त अटी लागू आहेत. खालील अतिरिक्त अटी आणि या अटीच्या मुख्य तरतुदी मध्ये काही मतभेद असल्यास, खालील अटी लागू होतील.

  • अटी मान्य करताना- या अटी मान्य करताना, आणि आमच्या सेवांमध्ये प्रवेश किंवा वापर करताना, तुम्ही कबूल करता की तुम्ही या अटी वाचल्या आहेत व जाणून घेतल्या आहेत आणि या अटींना व आमच्या प्रायव्हसी धोरणे व कम्युनिटी गाइडलाइन बंधनकारक असण्याला संमती देत आहात.
  • आमच्या सेवांमध्ये तुमचा प्रवेश आणि वापर- सेवेचा वापर करून तुम्ही अपलोड, अदलाबदल, वितरीत, स्टोअर किंवा कोणत्याही मार्गाने कोणतेही युजर कंटेंट उपलब्ध करून देऊ शकत नाही (यात कंटेंट निर्मिती आणि /किंवा स्ट्रीमिंग करण्याच्या हेतू सुध्दा समाविष्ट आहे)जे  आहेतः
    • बीभत्स, अश्लील, पेडोफिलिक आहे.,
    • पैशाची वसुली किंवा जुगाराशी संबंधित किंवा त्याला प्रोत्साहन देणारी आहे, किंवा कोणत्याही मार्गाने बेकायदेशीर कृती किंवा तत्सम.,
    • कोणत्याही मार्गाने बालकांना हानिकारक.,
    • अशा प्रकारच्या मेसेजच्या ओरिजनते विषयी फसवणूक करणे किंवा गैरसमज करून देणे किंवा अपमानकारक किंवा दहशतवादी असणाऱ्या कोणतीही माहितीवर चर्चा करणे., किंवा
    • सांघिकता, एकत्रितता, संरक्षण, सुरक्षा किंवा भारताच्या सार्वभौमत्व, विदेशी राज्यांसोबत असणारे मैत्रीचे नाते, यांना धोकादायक ठरणारे, किंवा सार्वजनिक निकाल, किंवा  कोणत्याही संज्ञेय गुन्हा करण्यास चिथावणी देणारे किंवा दुसऱ्या एखाद्या देशाचा अपमान करणारे.
  • युजर निर्मित कंटेंट- आपण याद्वारे मंजूर केलेल्या हक्कांच्या संदर्भात कोणत्याही कॉपीराइट बोर्डासह कोणत्याही प्राधिकरणासमोर कोणताही आक्षेप किंवा अन्य दावा मांडण्याचा अपरिवर्तनीयपणे माफ करण्याचा कोणताही अधिकार सोडून देत आहात. (भारतीय) कॉपीराइट कायदा १९५७ च्या कलम ३० अ च्या अन्वये किंवा इतर लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदींसह कोणत्याही अटींसह आम्हाला या अटींनुसार परवाना देण्यात आला आहे. वरील माफी आपण टिकटॉक आणि त्याच्या सर्व गट कंपन्या, संबध्द कंपन्या आणि व्याज व शीर्षकातील सदस्य, विद्यमान असो वा भविष्यकाळ, यांच्या बाजूने मंजूर केली आहे.
  • नुकसानभरपाई. या अटींनुसार किंवा कायद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही आदेशानंतर किंवा निर्णयाच्या अनुषंगाने आपण आम्हाला नुकसान भरपाई करणे आवश्यक असेल तर आपल्याला आमच्याकडे अशी रक्कम पाठविण्याकरिता नियामक प्राधिकरणांकडून सर्व आवश्यक मंजूरी आणि संमती प्राप्त होतील.