समुदायाची मार्गदर्शक तत्त्वे

शेवटचे  अपडेट 20 जानेवारी 2020

सर्जनशीलतेला प्रेरणा देऊन आनंद निर्माण करणे  हे TikTokचे ध्येय आहे. जिथे अभिजात असे काही निर्माण आणि यथार्थपणे शेअर करता येईल, आसपासच्या जगाचा आविष्कार करता येईल आणि जगभरातील इतर लोकांशी कनेक्ट करता येईल  अशा वापरकर्त्यांचा जागतिक समुदाय आम्ही निर्माण करत आहोत. हा समुदाय सुरक्षित राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध देखील आहोत. आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आमची मूल्ये प्रतिबिंबित होतात आणि आमच्या मंचाची एक सामाईक आचार संहिता विषद होते. ही मार्गदर्शक तत्त्वे आमच्या समुदायाला सुरक्षित सामायिक जागा राखण्यासाठी मदत देखील करतात.

TikTok हा जबाबदार मुक्त अभिव्यक्तीच्या पायावर उभारलेला एक समावेशक मंच आहे. समान गोष्टी करणारा समुदाय शोधत असताना, वापरकर्त्यांना एकमेव बनवणाऱ्या गोष्टी साजरे करण्यास आम्ही प्रोत्साहन देतो. आमचे वापरकर्ते व्यापक राष्ट्रीयत्व आणि संस्कृतींतील आहेत हे आमच्यासाठी बहुमोलाचे आहे आणि आम्ही ज्या देशांत काम करतो तेथिल सांस्कृतिक मापदंड आणि स्थानिक नियमावली आम्ही विचारात घेतो. 

एक सुरक्षित आणि समर्थक वातावरण देऊ करणे ही आमची  सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुक्तपणे आणि सर्जनशीलतेने व्यक्त होताना लोकांना सुखकर वाटण्यास मदत करण्यासाठी सुरक्षिततेची भावना असणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. फसवा आशय व खाती आमच्या मंचावरून दूर ठेवून प्रामणिक संवादाचे वातावरण निर्माण करणे हे देखील आमचे ध्येय आहे.

आमची मूल्ये आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचा पाया आहेत. आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ, ऑडिओ, प्रतिमा आणि मजकूर आम्ही हटवतो आणि तीव्र किंवा वारंवार उल्लंघन करण्यात सामिल असलेली खाती निलंबित करतो किंवा त्यांच्यावर बंदी घालतो. ठराविक परिस्थितींमध्ये, आमचा समुदाय सुरक्षित राखण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे जाऊन त्या खात्यांबाबत संबंधित विधी अधिकाऱ्यांकडे तक्रार करू.

आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे सर्वांना आणि TikTok वर शेअर केल्या जात असलेल्या सर्व गोष्टींना लागू होतात. या मंचावर कशाला परवानगी आहे आणि कशाला नाही याबाबत ती सर्वसाधारण मार्गदर्शन करतात. आमच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हटवला जाणारा काही आशय जनतेसाठी मौल्यवान असू शकतो याची जाणिव आम्हाला देखील आहे. .त्यामुळे, खालील विभागांत वर्णन केल्यानुसार, काही ठराविक परिस्थितींमध्ये आम्ही अपवाद मान्य करू शकतो.

समुदायाच्या वर्तनाबरोबर, आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांची उत्क्रांती होत रहावी म्हणून आम्ही  ही तत्त्वे वेळोवेळी अपडेट करतो, उद्भवणार्‍या जोखमी दूर करतो आणि सर्जनशीलता व आनंदासाठी TikTok ला एक सुरक्षित ठिकाण बनवतो.


धोकादायक व्यक्ती व संघटना

दहशतवाद, गुन्हा किंवा नुकसान करणाऱ्या इतर प्रकारच्या वर्तनाचा प्रचार करण्यासाठी आम्ही धोकादायक व्यक्ती किंवा संघटनांना आम्ही आमचा मंच  वापरू देत नाही. सार्वजनिक सुरक्षेला जेव्हा खात्रीलायक धोका असतो, तेव्हा खात्यावर बंदी घालून आणि संबंधित विधी अधिकाऱ्यांना सहकार्य करून आम्ही समस्या हाताळतो.

दहशतवादी व्यक्ती आणि दहशतवादी संघटना

दहशतवादी व्यक्ती आणि दहशतवादी संघटना म्हणजे कोणत्याही देशाचे नसलेले असे कार्यकर्ते  जे राजकीय, धार्मिक, वांशिक किंवा वैचारिक उद्दिष्टे साध्य करण्याकरिता लढू न शकणार्‍या व्यक्तींना नुकसान पोहोचवण्यासाठी जनता, सरकार किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांना धाक दपटशा दाखवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी पूर्वनियोजित हिंसा किंवा हिंसेच्या धमक्या वापरतात. 

इतर धोकादायक व्यक्ती व संघटना

गुन्हे करणाऱ्या किंवा इतर प्रकारचे तीव्र नुकसान करणाऱ्यांना आम्ही धोकादायक व्यक्ती व संघटना म्हणतो. यात समाविष्ट असणारे परंतु तेवढ्यातच मर्यादित नसणारे समूह किंवा गुन्ह्याचे प्रकार म्हणजे:

  • द्वेष 
  • हिंसक अतिरेकी संघटना
  • मनुष्यवध
  • मानवी तस्करी
  • अवयवांची तस्करी
  • शस्त्रास्त्रांची तस्करी
  • मादक पदार्थांची तस्करी
  • अपहरण
  • खंडणी मागणे
  • ब्लॅकमेल करणे
  • अवैध अर्थव्यवहार
  • फसवणूक 
  • सायबर
  • गुन्हा

हे पोस्ट करू नका:

  • धोकादायक व्यक्ती आणि/किंवा संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी नावे, चिन्हे, लोगो, ध्वज, घोषणा, गणवेश, हावभाव, व्यक्तिचित्रे किंवा इतर वस्तू 
  • धोकादायक व्यक्ती आणि/किंवा संस्थांची प्रशंसा, गौरव करणारा  किंवा त्यांना समर्थन देणारा मजकूर 
  • अपवाद: स्पष्टपणे विरोधी भाष्य म्हणून ओळखला जाऊ शकणारा शैक्षणिक, ऐतिहासिक, व्यंगात्मक, कलात्मक आणि इतर मजकूर किंवा ज्याचा उद्देश धोकादायक व्यक्ती आणि/किंवा संस्थांद्वारे झालेल्या नुकसानाबाबत जागरूकता वाढविणे हा आहे.


बेकायदेशीर कृत्ये आणि विनियमित पदार्थ

आम्ही काही ठराविक नियंत्रित वस्तूंचा व्यापार, विक्री, प्रचार आणि वापरास, तसेच गुन्हेगारी कारवायांचे चित्रण किंवा प्रचार करण्यास प्रतिबंध करतो. बेकायदेशीर आणि बहुतांश प्रदेशांत किंवा जगामध्ये बेकायदेशीर किंवा नियंत्रित असलेली कृत्ये किंवा पदार्थांशी संबंधित असलेला काही मजकूर, मग ती कृत्ये  किंवा पदार्थ ज्या न्यायाधिकारक्षेत्रात पोस्ट केल्या आहेत तिथे कायदेशीर असले तरीही , हटवला जाऊ शकते,. शैक्षणिक, वैज्ञानिक, कलात्मक आणि बातमी देण्यास योग्य असलेल्या मजकूरासारख्या.जनतेसाठी मूल्य प्रदान करणाऱ्या मजकूरास आम्ही अपवाद म्हणून परवानगी देतो.

गुन्हेगारी उपक्रमांचा प्रसार

गुन्हेगारी कारवायांमध्ये चोरी, प्राणघातक हल्ला, मानवी शोषण आणि इतर हानिकारक वर्तनांसह कायद्याद्वारे दंडनीय असलेली विस्तृत कृत्ये समाविष्ट होतात. असे वर्तन सामान्य होऊ नये किंवा त्याचे अनुकरण केले जाऊ नये असे आम्हाला वाटते, म्हणून आम्ही गुन्हेगारीच्या कृत्यांचा प्रसार करणारी सामग्री आम्ही हटवतो.

हे पोस्ट करू नका: 

  • मारहाण किंवा अपहरण यासारख्या शारीरिक नुकसान पोहोचवण्याच्या कृत्यांना प्रोत्साहन देणारा मजकूर
  • स्वॅटिंगसारख्या खोड्यांसह, इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा मजकूर
  • मानवी शोषण किंवा वन्यजीव तस्करीला प्रोत्साहन देणारा मजकूर
  • बेकायदेशीरपणे मिळवलेल्या वस्तूंची खरेदी, विक्री किंवा व्यापार देऊ करणारा मजकूर
  • गुन्हेगारी कृत्ये कशी करावी याबद्दल सूचना देणारा मजकूर

शस्त्रांची विक्री किंवा वापर

आमच्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी, आम्ही सहसा बंदुका, दारूगोळा, बंदुकीशी संबंधित उपसाधने किंवा स्फोटक शस्त्रांचे चित्रण, व्यापार किंवा प्रचार करण्यास परवानगी देत नाही. ती शस्त्रे कशी तयार करावी याबाबत सूचनांवरही 

आम्ही प्रतिबंध करतो. वस्तु संग्रहालयाचा भाग म्हणून, एखाद्या काल्पनिक रचनेत, लष्करी संचलनात पोलिस अधिकाऱ्याने बाळगणे किंवा शूटिंग रेंजसारख्या सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात वापरणे या सारख्या परिस्थितीत बंदुका किंवा इतर प्रकारच्या शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या मजकूरास आम्ही अपवाद म्हणून स्वीकृती देऊ शकतो.

हे पोस्ट करू नका: 

  • बंदुका, बंदुकीची उपसाधने, दारुगोळा किंवा स्फोटक शस्त्रांचे प्रदर्शन करणारा मजकूर
  • बंदुका, उपसाधने, दारुगोळा, स्फोटक शस्त्रे देऊ करणारी, विक्री, व्यापार किंवा आग्रह करणारा मजकूर किंवा त्यांचे उत्पादन कसे करावे याबाबत सूचना 

मादक पदार्थ आणि नियंत्रित पदार्थ

आम्ही मादक पदार्थ किंवा इतर नियंत्रित पदार्थांचा वापर किंवा व्यापार दाखवणाऱ्या मजकूरास , आमच्या समुदायाचे रक्षण करण्याच्या हेतूने आम्ही  परवानगी देत नाही.

हे पोस्ट करू नका: 

  • मादक पदार्थ, मादक पदार्थांचे सेवन प्रदर्शित करणारा किंवा इतरांना मादक पदार्थ किंवा इतर नियंत्रित पदार्थ बनविण्यास, वापरण्यास किंवा त्यांचा व्यापार करण्यास प्रोत्साहन देणारा मजकूर
  • मादक पदार्थ किंवा इतर नियंत्रित पदार्थांची विक्री करणारा, देऊ करणारा, व्यापार किंवा आग्रह करणारा मजकूर
  • बेकायदेशीर किंवा नियंत्रित पदार्थ कसे खरेदी करावे याबद्दल माहिती देणारा मजकूर

फसवणूक आणि घोटाळे

इतरांना हानी पोहोचवण्यासाठी आमचा मंच वापरण्यास आम्ही कोणालाही परवानगी देत नाही, यामध्ये व्यक्तींची फसवणूक किंवा मालमत्ता चोरीसारखी दुष्कृत्ये समाविष्ट आहेत. बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळविण्यासाठी लोकांना जाणीवपूर्वक  फसविणारा मजकूर आम्ही हटवतो.

हे पोस्ट करू नका:

  • फिशिंगला प्रोत्साहन देणारा मजकूर
  • पोंझी किंवा पिरॅमिड योजनांचा प्रचार करणारा मजकूर
  • पूर्वनिश्चित सट्टेबाजी, झटपट श्रीमंत व्हा योजना किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोटाळ्यांचा प्रचार करणारा मजकूर


हिंसक आणि ग्राफिक मजकूर

अतिव कष्ट  किंवा हिंसाचारास विशेषत:  उत्तेजन देते किंवा त्यांचा गौरव करते अशा अत्यंत भयानक किंवा धक्कादायक मजकूरास आम्ही परवानगी देत नाही. विशिष्ट परिस्थितीत आम्ही अपवादांना परवानगी देतो, उदाहरणार्थ, बातमी देण्यालायक किंवा समस्यांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी असलेला मजकूर. आम्हाला हिंसाचाराचा किंवा सार्वजनिक सुरक्षेस धोका खरोखरच असल्याचे जाणवते, तेव्हा आम्ही खात्यावर बंदी घालतो आणि आवश्यकतेनुसार आणि योग्य असेल तेव्हा संबंधित विधी अधिकाऱ्यांना सहकार्य करतो.

हिंसक आणि ग्राफिक मजकूर: मानवी

हे पोस्ट करू नका:

  • पुढील गोष्टींचा ज्यात समावेश होतो परंतु हे तेवढ्यासच मर्यादित नाही असा विनाकारण धक्कादायक, दु:खदायक किंवा अत्याधिक ग्राफिक असलेला मजकूर:
    • लोकांचा प्रत्यक्ष समावेश असलेल्या हिंसक किंवा अपघाती मृत्यूंचे चित्रण
    • तुटलेल्या, छिन्नविच्छिन्न, होरपळलेल्या किंवा जळलेल्या मानवी अवशेषांचे चित्रण
    • उघडी जखम किंवा दुखापतीवर मुख्य लक्ष केंद्रीत केलेले भोसकल्याचे चित्रण
    • तीव्र शारीरिक हिंसाचाराचे चित्रण. 
    • अपवाद: रंगमंचावरील/पूर्वनियोजित किंवा व्यावसायिक लढाई, पारंपरिक मार्शल आर्ट्स किंवा काल्पनिक प्रसंगातील लढाई

हिंसक आणि ग्राफिक मजकूर: प्राणी

हे पोस्ट करू नका:

  • पुढील गोष्टींचा ज्यात समावेश होतो परंतु हे तेवढ्यासच मर्यादित नाही असा विनाकारण धक्कादायक, दु:खदायक किंवा अत्याधिक ग्राफिक असलेला मजकूर 
    • प्राण्यांच्या प्रत्यक्ष कत्तलीचे चित्रण
    • तुटलेल्या, विकृत, होरपळलेल्या किंवा जळलेल्या प्राण्यांच्या अवशेषांचे चित्रण
    • प्राण्यांबाबत हिंसेचे चित्रण


आत्महत्या, स्वत:ला हानी पोहोचवणे आणि धोकादायक कृत्ये

हानी पोहोचवू शकणाऱ्या कृत्यांत सहभागी होण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. तसेच धोकादायक कृत्यांत भाग घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याचीही आम्ही वापरकर्त्यांना परवानगी देत नाही. स्वत:ला हानी पोहचवणाऱ्या किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मजकूरास आम्ही परवानगी देत नाही, परंतु या समस्यां बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या वापरकर्त्यांना त्यांचे अनुभव शेअर करण्याची परवानगी देतो.

स्वत:ला हानी पोहोचवण्याच्या किंवा आत्महत्येच्या विचारांशी झगडत असलेल्या वापरकर्त्यांना किंवा आत्महत्येचा गंभीरपणे विचार करणारे कोणी माहीत आहे अशा व्यक्तींना विधी अधिकाऱ्यांशी किंवा आत्महत्या प्रतिबंधक हॉटलाईनवर त्वरित  संपर्क साधण्यास प्रोत्साहन देतो. 

आत्महत्या

आत्महत्या, आत्महत्या करण्याच्या प्रवृत्ती किंवा तत्सम क्रियांमध्ये सहभागास प्रोत्साहन देणारा मजकूर आम्ही हटवतो. यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेली किंवा एखादी व्यक्ती अशी कृती करत आहे किंवा तिचा असे करण्याचा हेतू आहे ज्यामुळे ती स्वत:वर मृत्यू लादत आहे असा मजकूर समाविष्ट आहे. आत्महत्येची प्रशंसा, गौरव  किंवा त्यास प्रोत्साहन देणार्‍या किंवा आत्महत्या कशी करावी याबद्दल इतरांना सूचना देणार्‍या कोणत्याही प्रकारच्या मजकूरावर आम्ही प्रतिबंधित घालतो.

हे पोस्ट करू नका:

  • आत्महत्या कशी करावी याबद्दल सूचना देणारा मजकूर
  • आत्महत्येची प्रशंसा, गौरव करणारा किंवा त्यास प्रोत्साहन देणारा मजकूर
  • आत्महत्येची आव्हाने
  • अपवाद: आत्महत्येचा विचार करत असलेल्यांना आधार , संसाधने किंवा त्याचा सामना करणारी यंत्रणा प्रदान करणारा मजकूर

स्वतःला हानी पोहोचवणे

स्वतःला हानी पोहोचवणाऱ्या वर्तनाचे सामान्यीकरण करणे, त्यास प्रोत्साहन देणे किंवा चालना देणे टाळण्यासाठी, वापरकर्त्याचा हेतू काहीही असला तरी अशा वर्तनाचे वर्णन करणाऱ्या प्रतिमांना आम्ही परवानगी देत नाही. ज्या कृतींमुळे स्वतःला इजा करण्यास प्रोत्साहन दिले जाते किंवा प्रोत्साहन दिले जाऊ शकते असा मजकूर आम्ही हटवतो. आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असलेल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणाऱ्या मजकूरासही या व्यासपीठावर परवानगी नाही.

हे पोस्ट करू नका:

  • स्वतःला केलेल्या जखमा दाखवणारा मजकूर
  • स्वत:ला हानी कशी पोहोचवावी याबाबत सूचना देणारा मजकूर
  • वजन कमी करण्यासाठी प्रो-आना किंवा इतर धोकादायक वर्तनाचे समर्थन करणारा मजकूर
  • अपवाद: खाण्यासंबंधी विकारांनी ग्रस्त असलेल्यांना किंवा स्वत:ला इजा करण्यात भाग घेत असलेल्यांना आधार देणारी संसाधने किंवा त्याचा सामना करणारी यंत्रणा प्रदान करणारा मजकूर

धोकादायक कृत्ये

अव्यावसायिक पार्श्वभूमीवर किंवा आवश्यक नैपुण्या अभावी, जनतेला गंभीर दुखापत होऊ शकते वा त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी जोखिम असणारी कृत्ये किंवा धोकादायक वर्तन. अशा वर्तनास प्रोत्साहन देणाऱ्या, त्याचा प्रचार करणाऱ्या किंवा गौरव करणाऱ्या मजकूरास आम्ही परवानगी देत नाही ज्यात हौशी धाडसी स्टंट्स आणि धोकादायक आव्हाने सामिल आहेत.

हे पोस्ट करू नका:

  • धोकादायक साधनांचा अयोग्य वापर दाखवणारा मजकूर
  • सेवनासाठी योग्य नसलेले द्रव किंवा खाद्य पदार्थ खात असल्याचे दर्शविणारा मजकूर
  • ज्यामुळे दुखापत होऊ शकते अशी धोकादायक आव्हाने
  • कायदेशीर वयाहून कमी वयाच्या अज्ञान व्यक्तींनी मोटार वाहने चालवत असल्याचे दर्शविणारा मजकूर


द्वेषयुक्त भाषण 

संरक्षित वैशिष्ट्यांच्या आधारावर एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या गटावर हल्ला करणारी किंवा हिंसाचारास उत्तेजन देणारा मजकूरास आम्ही परवानगी देत नाही. द्वेषयुक्त भाषण असलेल्या मजकूरास आम्ही परवानगी देत नाही आणि आमच्या मंचावरूत तो आम्ही काढून टाकतो. द्वेषयुक्त भाषणांद्वारे अनेकदा उल्लंघन करणारी खाती सुद्धा आम्ही निलंबित करतो किंवा त्यांवर बंदी आणतो. 

संरक्षित गटांवर हल्ले

संरक्षित वैशिष्ट्यांच्या आधारावर एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या गटावर हल्ला करणाऱ्या, धमकी देणाऱ्या, हिंसा भडकवणाऱ्या किंवा त्यांच्याशी अमानुष वर्तन करण्याचा हेतू असलेल्या मजकूरास आम्ही द्वेषयुक्त भाषण म्हणतो. खालीलपैकी कोणत्याही संरक्षित गुणधर्मांवर आधारीत एखाद्या व्यक्तीस किंवा समूहास मौखिक किंवा शारीरिक हिंसेची धमकी देणार्‍या किंवा इजेचे चित्रण करणार्‍या मजकूरासही आम्ही परवानगी देत नाही :

  • वंश 
  • वांशिकता
  • राष्ट्रीय मूळ 
  • धर्म
  • जात 
  • लैंगिक अभिमुखता
  • लिंगभाव
  • लिंग
  • लैंगिक ओळख
  • गंभीर आजार किंवा अपंगत्व
  • निर्वासन स्थिती

हे पोस्ट करू नका:

  • पुढील गोष्टींचा समावेश असणारा परंतु हे तेवढ्यासच मर्यादित नसणारा,: वर सूचीबद्ध केलेल्या गुणधर्मांवर आधारित व्यक्ती किंवा गटांविरूद्ध हिंसा किंवा द्वेषबुद्धीने अमानुषता पसरवणारा किंवा त्यास उत्तेजना देणारा मजकूर.
    • ते शारीरिक किंवा नैतिकदृष्ट्या निकृष्ट असल्याचा दावा करणे
    • त्यांच्याविरूद्ध हिंसाचार पसरवणे किंवा त्याचे समर्थन करणे
    • ते गुन्हेगार आहेत असा दावा करणे 
    • त्यांचा जनावरे, निर्जीव वस्तू किंवा इतर निर्जीव घटक म्हणून नकारात्मक उल्लेख करणे 
    • त्यांना वगळणे, किंवा वेगळे पाडणे, त्यांच्याबाबत भेदभाव करण्यास प्रोत्साहन देणे किंवा त्याचे समर्थन करणे

स्लर्स –अपमानास्पद ताशेरे

स्लर्स म्हणजे अपमानजनक संज्ञा ज्या वांशिकता, वंश किंवा वर सूचीबद्ध केलेल्या इतर कोणत्याही संरक्षित विशेषतांबाबत तुच्छतापूर्ण बोलणे. आमच्या मंचावर त्यांना परवानगी नाही कारण अत्यंत वाईट पद्धतीने आक्षेपार्ह संज्ञा पसरविण्यात आम्हाला हातभार लावायचा नाही. तथापि, आम्हाला याची जाणीव आहे की स्वत:च्या संदर्भातही स्लर्सचा वापर केला जाऊ शकतो किंवा त्याची पुनर्निर्मिती केली जाऊ शकते आणि गाणे किंवा स्व-संदर्भातील इतर व्यंगात्मक आणि/किंवा पुनर्निर्मितीच्या उदाहरणात स्लर्स वापरले जातात तेव्हा आम्ही त्यास अपवाद करू शकतो. 

हे पोस्ट करू नका: 

  • सर्व-मान्यता नसलेल्या स्लर्सना चालना देणारा मजकूर

द्वेषपूर्ण मतप्रणाली

द्वेषपूर्ण मतप्रणाली आमचा मंच प्रदान करत असलेल्या समावेशक आणि समर्थक समुदायाशी विसंगत आहेत. द्वेषपूर्ण मतप्रणालींना प्रोत्साहन देणारा मजकूरआम्ही हटवतो. 

हे पोस्ट करू नका: 

  • द्वेषपूर्ण मतप्रणालीशी संबंधित व्यक्तींची नावे घेऊन किंवा त्या संबंधित लोगो, चिन्हे, ध्वज, घोषणा, गणवेश, अभिवादने, हावभाव, व्यक्तीचित्रे, चित्रे प्रदर्शित करण्यास किंवा त्यांच्याबाबत सकारात्मकतेने बोलण्यास प्रोत्साहन देणारा मजकूर
  • कागदोपत्री पुरेशी नोंद झालेल्या आणि घडलेल्या हिंसक घटनांना यास नकार देणारा मजकूर
  • द्वेषपूर्ण विचारसरणीला प्रोत्साहन देणारे संगीत किंवा गीतरचना 


छळ आणि गुंडगिरी

वापरकर्त्यांना लाज, अपमान, गुंडगिरी किंवा छळ होण्याच्या भीतीविना अन सुरक्षितपणे स्वत:ला व्यक्त करता आले पाहिजे. अपमानास्पद मजकूरामुळे व्यक्तींना होणारा मानसिक त्रास आम्हाला संपूर्णत: समजतो आणि आम्ही आमच्या मंचावर अपमानास्पद सामग्री किंवा वर्तनास परवानगी देत नाही. 

अपमानास्पद वर्तन

अशा परंतु तेवढ्यासच मर्यादित नसलेल्या छळाच्या सर्व अभिव्यक्ती  ज्यात हिंसक धमक्या, लैंगिक छळ, रूप, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म आणि स्वच्छतेबाबत अपमानास्पद विधाने समाविष्ट आहेत आम्ही हटवतो 

हे पोस्ट करू नका:

  • हिंसेचा वापर करून एखाद्या व्यक्तीस धमकावणारा मजकूर
  • एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, गंभीर आजार व्हावा, शारीरिक किंवा इतर हानी व्हावी इच्छा व्यक्त करणारा मजकूर
  • हिंसा किंवा समन्वित छळ करण्यास प्रवृत्त करणारा मजकूर
  • एखाद्या वापरकर्त्याच्या लैंगिक कृतींना कमी लेखून किंवा अवांछित लैंगिक संपर्क साधण्याचा प्रयत्न करुन लैंगिक छळ करणारा मजकूर
  • बुद्धीमत्ता, रूप, व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म किंवा स्वच्छतेसारख्या विशेषतांच्या आधारे खासगी व्यक्तीचा तिरस्कार करणारा मजकूर
  • हिंसक शोकांतिकेचे कौतुक करणारी आणि त्याच्या पिडितांना कमी लेखणारा मजकूर
  • इतर वापरकर्त्यांना लक्ष्य करणारी अपमानास्पद सामग्री तयार करण्यासाठी TikTok ची ड्युएट, रिॲक्ट(प्रतिक्रिया) किंवा इफेक्ट (प्रभाव) ही वैशिष्ट्ये वापरणारा मजकूर

इतरांच्या गोपनीयतेचचेउल्लंघन

व्यक्तीच्या नावे ओळखता येणारी माहिती उघड करणे किंवा तशी धमकी देणे यामुळे गंभीर भावनिक त्रास होऊ शकतो आणि वास्तविक जगात नुकसान होऊ शकते. आम्ही याला दुर्वर्तनाचे एक स्वरूप समजतो आणि TikTokवर याला अनुमती देत नाही.

हे पोस्ट करू नका: 

  • असा, परंतु त्यापुरतीच मर्यादित नसलेली वैयक्तिकरित्या ओळखता येणारी माहिती उघड करणारा किंवा तशी धमकी देणारा मजकूर ज्यात निवासी पत्ता, खाजगी ईमेल पत्ता, खाजगी फोन नंबर, बँक विवरणपत्र, सामाजिक सुरक्षा क्रमांक किंवा पासपोर्ट नंबर समाविष्ट आहेत
  • लैंगिक प्रतिमा किंवा सहमती नसलेल्या उत्कट प्रतिमा उघड करण्याची धमकी


प्रौढ नग्नता आणि लैंगिक कृती

TikTok वर आम्ही लैंगिकरित्या सुस्पष्ट किंवा संतोष देणाऱ्या मजकूरास परवानगी देत नाही, यामध्ये अशा स्वरूपाच्या अॅनिमेटेड सामग्रीचाही समावेश होतो. लैंगिक स्वरूपाच्या मजकूरात काही न्यायाधिकारक्षेत्रांमध्ये कायदेशीर दंड आकारला जाणे आणि सहमती नसलेल्या प्रतिमा सामायिक करून ,इतर वापरकर्त्यांना हानी पोहोचवणे (उदाहरणार्थ, बदला घेणारे अश्लील साहित्य), अशा अनेक जोखमी असतात. तसेच, काही ठराविक संस्कृतींमध्ये उघड/अवाजवी लैंगिक मजकूर आक्षेपार्ह असू शकतो. शैक्षणिक, माहितीपट, वैज्ञानिक किंवा कलात्मक हेतूंसाठी नग्नता आणि लैंगिक सुस्पष्ट मजकूर ,अशा अपवादांना आम्ही अनुमती देतो. उदाहरणार्थ, मास्टेक्टॉमीच्या(स्तनांची शस्त्रक्रिया) व्रणांवर चर्चा करणाऱ्या किंवा ते दाखविणाऱ्या सामग्रीस अनुमती दिली जाते.

लैंगिक शोषण

असुरक्षितता, सत्ता किंवा विश्वासाचा लैंगिक हेतूंसाठी वास्तविक गैरवापर किंवा तसा प्रयत्न म्हणजे लैंगिक शोषण यामध्ये दुसऱ्याचे लैंगिक शोषण करून स्वतःचा आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय फायदा मिळवण्याचा समावेश होतो परंतु हे तेवढ्यासच मर्यादित नाही.

हे पोस्ट करू नका: 

  • सहमती नसलेल्या लैंगिक कृत्यांचे चित्रण करणारा, तसे करवणारा किंवा उत्तेजित करणारा मजकूर
  • लैंगिक आग्रह किंवा लैंगिक वस्तुनिष्ठ अभिव्यक्ती करणारा, प्रोत्साहन  किंवा त्याचा गौरव करणारा मजकूर

प्रौढांचा समावेश असलेले अश्लील साहित्य आणि नग्नता

लैंगिक समाधानाच्या उद्देशाने लैंगिक अवयव आणि/किंवा क्रियांचे स्पष्टपणे वर्णन करणारे अश्लील साहित्य. 

हे पोस्ट करू नका: 

  • योनीत प्रवेश करताना, प्रवेश न करताना किंवा मौखिक समागम दर्शवणारी  चित्रे/मजकूर
  • मानवी जननेंद्रिय, स्त्रीची स्तनाग्रे किंवा नितंब दर्शविणारी चित्रे/मजकूर
  • लैंगिक उत्तेजना दर्शविणारा मजकूर
  • लैंगिक स्तोम/खूळ दर्शविणारा मजकूर 


अल्पवयीनांची सुरक्षा

मुलांच्या सुरक्षेबाबत आम्ही मनापासून वचनबद्ध आहोत आणि अल्पवयीन मुलांबाबत त्यांचे शोषण करण्याच्या किंवा कुरवाळण्याचे वर्तन आम्ही मुळीच सहन करू शकत नाही. डिजिटल किंवा वास्तविक जगाच्या स्वरूपात बाल शोषण, बाल नग्नता किंवा मुलांचे लैंगिक शोषण चित्रित करणाऱ्या किंवा त्याचा प्रसार करणाऱ्या मजकूरास आम्ही परवानगी देत नाही आणि आम्ही अशा मजकूराबाबत आम्ही विधी  अधिकाऱ्यांना कळवतो. दोषी वर्तनामध्ये गुंतलेली अल्पवयीन मुले दर्शवणाऱ्या मजकूरासही आम्ही अनुमती देत नाही. 

TikTok वापरण्यासाठी वापरकर्त्यांनी (आमच्या सेवा अटींमध्ये नमूद केल्यानुसार) किमान वयाच्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत. जेव्हा अल्पवयीन खातेधारक ओळखले जातात, तेव्हा आम्ही आमच्या मंचावरून त्यांची खाती हटवतो आणि त्यांच्या प्रदेशात उपलब्ध असल्यास, अधिक योग्य अॅप अनुभवाकडे त्यांना निर्देशित करू शकतो.

अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली नग्नता आणि लैंगिक शोषण 

खाजगी अवयव स्पष्ट दाखवणाऱ्या सामग्रीचा नग्नतेमध्ये समावेश होतो. लैंगिक शोषण म्हणजे लैंगिक हेतूंसाठी असुरक्षितता, सत्ता किंवा विश्वासपात्रतेच्या संबंधांचा वास्तविक गैरवापर किंवा तसा प्रयत्न, यामध्ये दुसऱ्याचे लैंगिक शोषण करून स्वतःचा आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय फायदा मिळवण्याचा समावेश होतो परंतु हे तेवढ्यासच मर्यादित नाही.

हे पोस्ट करू नका: 

  • अल्पवयीनांचे खाजगी अवयव दर्शविणारा मजकूर
  • अल्पवयीनांचे लैंगिक शोषण दर्शविणारा मजकूर
  • योनीत प्रवेश करताना, प्रवेश न करताना किंवा मौखिक समागम दर्शवणारा अल्पवयनीनांचा सहभाग असलेला मजकूर
  • अल्पवयीनांमध्ये लैंगिक उत्तेजना दर्शविणारा मजकूर
  • अल्पवयीनांमध्ये लैंगिक स्तोम दर्शविणारा मजकूर

अल्पवयीनांचे अपराधी वर्तन  

अपराधी वर्तनात मादक पदार्थ, मद्य आणि तंबाखूच्या सेवनाचा समावेश होतो परंतु ते तेवढ्यासच मर्यादित नाही. 

हे पोस्ट करू नका:

  • अल्पवयीन मुले, मद्य, मादक पदार्थ किंवा तंबाखूचे सेवन करत आहेत, जवळ बाळगत आहेत किंवा त्यांचे सेवन केल्याचा संशय आहे असे दर्शविणारा मजकूर

बाल शोषण

सत्तेतील व्यक्तीने व्यक्तीने अल्पवयीनास शारीरिक आणि/किंवा मानसिक आघात पोहोचवणे अशी बाल शोषणाची व्याख्या केली जाते. शारीरिक शोषण ही एक कृती आहे ज्यामध्ये लहान मुलाच्या शरीरावर जाणीवपूर्वक इजा केली जाते. मानसिक अत्याचार म्हणजे शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराने किंवा धमकीच्या तंत्रांनी लहान मुलाला त्रास देणे.

हे पोस्ट करू नका: 

  • अल्पवयीनांचा समावेश असलेली शारीरिक किंवा मानसिक अत्याचार दर्शविणारा मजकूर

कुरवाळणे

कुरवाळणे म्हणजे लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण किंवा लैंगिक तस्करीच्या उद्देशाने अल्पवयीनाचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रौढ व्यक्तीने त्याच्याशी भावनिक संबंध निर्माण करणे.

हे पोस्ट करू नका: 

  • कुरवाळण्याच्या वर्तनास प्रोत्साहन देणारी, तसे निर्देश देणारी, किंवा त्याचे समर्थन करणारा मजकूर
  • उघड लैंगिक संभाषणात अल्पवयीनांना सहभागी करणारा मजकूर
  • उघड लैंगिक साहित्य प्रसारित करण्यास अल्पवयीनांस प्रोत्साहन देणारा किंवा ब्लॅकमेल करणारा मजकूर

अल्पवयीन मुलांना लैंगिकतेचे द्योतक बनवणे

अल्पवयीनांवर लैंगिकता लादणारी किंवा लैंगिकतेचे द्योतक बनवणार्‍या मजकूरास आम्ही परवानगी देत नाही.

हे पोस्ट करू नका: 

  • अल्पवयीनांचा समावेश असलेली कामुक नृत्ये दर्शविणारा मजकूर
  • अल्पवयीनांचा समावेश असलेली लैंगिक किंवा कामुक भाषा असलेला मजकूर


सचोटी आणि सत्यता

विश्वासाच्या पायावर आधारित आमच्या समुदायास ,समुदाय सदस्यास फसवणे  किंवा त्याची दिशाभूल करण्याचा हेतू असलेला मजकूर धोका उत्पन्न करतो . आमच्या मंचावरर आम्ही अशा मजकूरास परवानगी देत नाही. यात स्पॅमिंग, तोतयागिरी आणि अपप्रचाराच्या मोहिमांसारख्या कृतींचा समावेश होतो.

स्पॅम

मंचावर कृत्रिमरित्या लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न करणारा मजकूर किंवा कृतीस प्रतिबंध आहे. परस्पर संवादांचे मेट्रिक्स वाढविण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांनाही आम्ही प्रतिबंध करतो. 

हे करू नये:

  • व्ह्यूज, लाईक्स, फॉलोअर्स, शेअर्स किंवा टिप्पण्या कृत्रिमरित्या कशा वाढवायच्या याबाबत सूचना शेअर करणे
  • व्ह्यूज, लाईक्स, फॉलोअर्स, शेअर्स किंवा टिप्पण्या विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यात सहभागी होणे
  • कृत्रिम ट्रॅफिक जनरेशन (मंचावरील कार्यविधींची मात्रा)  निर्मिती सेवांचा प्रचार करणे
  • खोटी किंवा फसव्या तोतयागिरी अंतर्गत एकाहून जास्त TikTok खाती चालवणे, यामध्ये अनैतिक उपक्रम करण्यासाठी समन्वयित प्रयत्न करणे, व्यावसायिक स्पॅम वितरित करणे किंवा अन्यथा TikTok धोरणांचे एकत्रित उल्लंघन करणे यांचा समावेश होतो.

तोतयागिरी

जनतेला फसविण्यासाठी इतर व्यक्ती किंवा संस्थांच्या नावांनी तोतयागिरी करण्यास आम्ही वापरकर्त्यांना परवानगी देत नाही. आम्ही तोतयागिरीच्या सूचनांची शहानिशा करून खात्री करून घेतल्यानंतर आम्ही उल्लंघन करणारी खाती हटवतो. एखादे खाते आपली ओळख किंवा TikTok वरील हेतूबाबत इतरांची दिशाभूल करीत नाही तोपर्यंत आम्ही विडंबन, टीका किंवा चाहत्यांच्या खात्यांच्या अपवाद म्हणून आम्ही परवानगी देतो.

हे पोस्ट करू नका: 

दुसऱ्या कोणाचे नाव, चरित्रात्मक तपशील किंवा प्रोफाइल चित्र वापरुन दुसरीच व्यक्ती किंवा संस्था म्हणून दिशाभूल करणारी माहिती देणे.

दिशाभूल करणारी माहिती

आपल्या समुदायाचे किंवा जनतेचे नुकसान होऊ शकेल अशा चुकीच्या माहितीस आम्ही परवानगी देत नाही. आमच्या वापरकर्त्यांना महत्त्वाच्या वाटत असलेल्या विषयांबद्दल आदरपूर्वक संभाषण करण्यास आम्ही प्रोत्साहन देतो, परंतु एखाद्याच्या आरोग्यास किंवा मोठ्या सार्वजनिक सुरक्षेस हानी पोहोचवू शकणारी चुकीची माहिती आम्ही काढून टाकतो. अपप्रचार मोहिमेद्वारे वितरित केलेला मजकूर देखील आम्ही काढून टाकतो. 

हे पोस्ट करू नका:

  • भीती, द्वेष किंवा पूर्वग्रह वाढविण्याचा हेतू असलेली चुकीची माहिती 
  • एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकणारी चुकीची माहिती, उदा. वैद्यकीय उपचारांबद्दल दिशाभूल करणारी माहिती
  • नुकसान पोहोचवण्याच्या हेतून केलेली फसवणूक, फिशिंगचे प्रयत्न किंवा फेरफार केलेला मजकूर
  • निवडणूका किंवा इतर नागरी प्रक्रियांबद्दल समुदाय सदस्यांची दिशाभूल करणारा मजकूर 

बौद्धिक मालमत्ता

मूळ व नविन मजकूर तयार करण्यास आणि शेअर करण्यास आम्ही सर्वांना प्रोत्साहन देतो. दुसऱ्या कोणाच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन करणारा मजकूर प्रकाशित करण्यास किंवा वितरित करण्यास आम्ही वापरकर्त्यांना परवानगी देत नाही.

हे पोस्ट करू नका:

  • एखाद्याच्या कॉपीराइट, व्यापारचिन्हे किंवा इतर बौद्धिक मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन किंवा भंग करणारा मजकूर


मंचाच्या सुरक्षेस धमक्या

वर अधोरेखित केलेला मजकूर व वर्तनाव्यतिरिक्त, TikTok सेवांना कमी लेखणार्‍या करणाऱ्या कृतींना आमची धोरणे प्रतिबंध करतात:

  • TikTok ची वेबसाइट, अॅप किंवा संबंधित नेटवर्क हॅक करू नका किंवा वापरकर्त्यांचा प्रवेश निर्बंधित करण्यासाठी त्याच्या उपाययोजनांना बायपास करू नका
  • व्हायरस, ट्रोजन हॉर्स, वर्म्स, लॉजिक बॉम्ब किंवा दुर्भावनायुक्त किंवा हानिकारक मजकूराच्या फायली वितरित करू नका
  • कोणत्याही फायली, तक्ते किंवा दस्तऐवजांसह TikTok वर आधारित कोणतीही साधित उत्पादने तयार करू नका किंवा त्यांमध्ये सुधारणा, रुपांतर, अनुवाद, रिव्हर्स इंजिनिअर, डिअसेंबल, डीकंपाईल करू नका, तसेच TikTok मधील कोणतेही स्रोत कोड, अल्गोरिदम, पद्धती किंवा तंत्रे पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करू नका
  • TikTok कडून माहिती गोळा करण्यासाठी स्वयंचलित स्क्रिप्ट वापरू नका

आमच्या चैतन्यमय जागतिक समुदायाचा भाग बनल्याबद्दल आणि सर्व वापरकर्त्यांसाठी एक सुरक्षित जागा राखण्यात आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करू शकेल असे तुम्हाला वाटणारा मजकूर किंवा खाती तुम्हाला आढळल्यास कृपया आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही त्याचा आढावा घेऊन योग्य कारवाई करू.